Amit Patkar Goa Congress | 'मला बैठकीचे निमंत्रणच नव्हते!' गोवा काँग्रेसमधील अंतर्गत वादावर माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा गौप्यस्फोट

Amit Patkar Goa Congress | अमित पाटकर : कुठल्या नंबरवरून कुठे निमंत्रण सर्व अस्पष्ट
Amit Patkar Goa
Amit Patkar Goa
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मला बैठकीचे कुठल्याही प्रकारे, कोणीही निमंत्रण दिले नव्हते. काहीजण सांगतात की, फोन नंबर ब्लॉक केला असेल, तर मेसेज कसा पोहोचणार. त्यामुळे त्यांनी मला कुठल्या नंबरवरून कुठल्या नंबरवर निमंत्रण दिले ते स्पष्ट करावे, असे आव्हान काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिले.

Amit Patkar Goa
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

पाटकर म्हणाले, घरी असताना सकाळी मी माझा आणि कॅ. व्हेरियतो फर्नांडिस यांचा फोटो पाहून बैठकीला अनुपस्थित असल्याची पोस्ट आणि प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा बाईट पाहिला. तेव्हा मला कळले की, बैठक होती. ठाकरे यांच्यासोबत मी प्रदेशाध्यक्ष म्हणून दोन वर्षे काम केले आहे. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही.

पण ठाकरे यांना स्थानिक नेतृत्वाकडून आम्ही निरोप देतो; पण पाटकरच बैठकीला येत नाहीत, अशी चुकीची माहिती पुरवली जात असावी. पाटकर म्हणाले की, मला फक्त एकदाच राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले होते. परंतु त्याच दिवशी मी मडगाव येथे शिक्षकांच्या संमेलनाला उपस्थित होतो. त्याची पक्षालाही कल्पना होती. त्यामुळे मी बैठकीला उपस्थित राहू शकलो नव्हतो.

काँग्रेसच्या अधिकृत व्यासपीठाचा कसा गैरवापर केला जातो, याबाबतची माहिती मी पक्षश्रेष्ठींना दिली आहे.काहीजण गोव्याच्या जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करताहेत, पण जनता तशी बनणार नाही.

नकारात्मक सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नातून काय साध्य होणार आहे आणि कुणाचा फायदा आहे, असा सवालही पाटकर यांनी केला. गोवा राखण यात्रेबद्दल आपल्याला काहीच माहित नाही. मी कुडचडेवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र यात्रा कुडचडेत येणार की नाही याबाबतही मला कल्पना नाही.

Amit Patkar Goa
ST Political Reservation | "एसटी राजकीय आरक्षणासाठी 13 ऑगस्टला 'चलो पणजी'! 'उटा' संघटनेचा सरकारला थेट इशारा"

ठाकरे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, गृहमंत्री होते. एका ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तीला चुकीची माहिती पुरविली जाने योग्य नाही, असेही ते म्हणाले.

शॉर्टसर्किट कुठे झाले माहीत नाही

गोवा फॉरवर्ड हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तयार केलेल्या आघाडीतील पक्ष आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डशी पक्षश्रेष्ठी आणि उच्चस्तरावरून चर्चा व्हायला हवी. मी प्रदेशाध्यक्ष होतो, तोपर्यंत सगळे चांगले होते, आता कुठे शॉर्टसर्किट झाले माहीत नाही, असेही पाटकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news