Raigad Crime | १ कोटी ४९ लाखाचा गोवा बनावटीचा मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाने महाडजवळ पकडला!

ट्रक चालकासह, ट्रक मधील १४८० बॉक्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात. !
Raigad Crime
१ कोटी ४९ लाखाचा गोवा बनावटीचा मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाने महाडजवळ पकडला !
Published on
Updated on

महाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड जवळील केंबुर्ली गावाजवळ गोव्यावरून गुजरात कडे जाणाऱ्या राजस्थानी पासिंग असलेल्या एका ट्रक मध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला. हा साठा गोव्यावरून गुजरात मध्ये जात होता. याची अंदाजे किंमत एक कोटी ४९ लाख१८ हजार ४०० इतकी असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान सापळा रचला आणि ११:३० वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील केंबुर्ली गाव हद्दीत आर जे-१९-जी ई -४११५ या ट्रकला थांबून त्याची तपासणी केली असता या ट्रकमध्ये गोवा बनावटीची रॉयल ब्लू मल्टी व्हिस्की ही सापडली.

याप्रकरणी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेऊन हा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाड येथील कार्यालयात नेण्यात आला त्यानंतर केलेल्या चौकशी नंतर या ट्रक मधून गोवा राज्यातून गोवा बनावटीची दारू गोव्यावरून गुजरात मध्ये घेऊन जात असल्याची माहिती समोर आली.

याप्रकरणी ट्रक चालक प्रभुलाल भवरलाल साळवी रा. राजस्थान याला ताब्यात घेण्यात आली असून १ कोटी ४९ लाख १८ हजार ४०० रुपये किमतीची दारू, १० लाखाचा ट्रक आणि ८ हजाराचा मोबाईल असा एकूण १ करोड ५९ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. ही कारवाई मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर पथकात दुय्यम निरीक्षक एस.पी. पीसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक निमेश नाईक, जवान मनोज गायकवाड, ज्ञानेश्वर पोटे, महिला जवान रचना मोहिते, यांचा समावेश आहे.

logo
Pudhari News
pudhari.news