Goa Assembly Monsoon Session : 'प्रश्नोत्तराचा तास चुकवण्यासाठीच सरकारकडून माफीनाम्याचा विषय'

आमदार विजय सरदेसाई यांचा सरकारवर आरोप
MLA Vijay Sardesai allegations against the government
प्रश्नोत्तराचा तास चुकवण्यासाठीच सरकारकडून माफीनाम्याचा विषय : आमदार विजय सरदेसाई Pudhari Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सरकारला प्रश्नोत्तराचा तास चुकवायचा असल्यामुळेच काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या माफीनाम्याचा विषय उगाळत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. सभापती रमेश तवडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आमदार डिकॉस्टा यांनी माफी मागावी हा विषय सत्ताधारी आमदारांनी पुन्हा एकदा लावून धरला. या विषयावर गदारोळ झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. (Goa Assembly Monsoon Session)

MLA Vijay Sardesai allegations against the government
गोवा विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब

या विषयावर बोलताना आमदार सरदेसाई म्हणाले, सरकारला प्रश्नोत्तराचा तास चुकवायचा आहे. त्यामुळेच सत्ताधारी आमदारांकडून माफी मागण्याचा विषय उगाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सरकारला प्रश्नोत्तराचा तास चुकवायचा नसून हा विषय सभापती आसनाच्या सन्मानाचा आहे असे त्‍यांनी स्पष्टीकरण दिले.(Goa Assembly Monsoon Session)

MLA Vijay Sardesai allegations against the government
Goa Rain Update | गोव्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; कोकण रेल्वेकडून तीन गाड्या रद्द

यावर आमदार डिकॉस्टा यांनी माफी न मागण्याच्या भूमिकेवर ठाम राहत आपण आपली भूमिका हक्कभंग समिती समोर मांडणार असल्याचे सांगितले.(Goa Assembly Monsoon Session)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news