

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मये तलावाकडे पर्यटकांची पावले वळली आहेत. इअर एंडिंगच्या पार्श्वभूमीवर मये तलावात पेंडल बोटिंगला प्राधान्य दिले जात आहे. अनेक देशी पर्यटक थर्टी फर्स्टच्या निमित्ताने आपल्या मुलाबाळांसह बोटिंगचा आनंद घेत आहेत.
सर्व वयोगटातील पर्यटक याठिकाणी दिसत आहेत. निसर्गरम्य परिसरात वसलेला मये तलाव देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करून घेईल इतका सुंदर आहे. मये गावच्या पर्यटन उद्योगासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हा तलाव महत्वाची भूमिका बजावत आहे.
पर्यटकांना भुरळ घालण्यात तो कमी नाही. तथापि, गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची पावले या पर्यटन स्थळाकडे वळत नव्हती. नितांतसुंदर असलेल्या या सौंदर्यस्थळाला आता पर्यटकांनी भेट द्यायला सुरुवात केली आहे. ऑक्टोबरमध्ये पर्यटन हंगाम सुरू झाला असला, तरी या तलावावर तुरळक पर्यटक दिसत होते.
तलावाला झळाळी; पण सरकारी प्रयत्न अपुरे गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे सुमारे दहा कोटी खर्च करून मये तलावाला नवी झळाळी देण्यात आली. परंतु, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारी पातळीवरून विशेष प्रयत्न झाले नाहीत. चार वर्षांपूर्वी विकासकामाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, त्यानंतर अपवाद सोडल्यास या पर्यटन स्थळावर पर्यटकांची फारशी गर्दी दिसून आली नव्हती.
पाच राज्यात किती महिलांना उमेदवारी
पर्यटकांसाथीच्या योजनांचे पुनरुजीवन आवश्यक गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे दोन वर्षांपूर्वी पर्यटनस्थळ दर्शन अंतर्गत मये तलावावर पर्यटकांसाठी बससेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेमुळे पर्यटनाला नवा आयाम मिळेल, अशी आशा होती. मात्र, काही दिवसांनंतर ही योजना गुंडाळण्यात आल्याने बससेवा बंद पडली, पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी अशा योजनांचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे.