when-will-elephant-management-be-in-place-in-konkan-and-kolhapur
कोल्हापूरसह कोकणात धुडगूस घालणार्‍या हत्तींचा बंदोबस्त कधी?Pudhari File Photo

Dodamarg Elephant Attack | घोटगेवाडीत हत्तींचा धुडगूस; शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बागायती उद्ध्वस्त

Dodamarg Elephant Attack | केंद्राचा निर्णय; आरोग्यासाठी धोकादायक
Published on

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा

घोटगेवाडी येथे पाच हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घालून येथील बागायती उद्ध्वस्त केली आहे. यात शेतकरी विठ्ठल शंभू गोवेकर व नारायण महाबळेश्वर भणगे यांच्या नारळ, सुपारी व केळींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

when-will-elephant-management-be-in-place-in-konkan-and-kolhapur
Goa Night Club Fire | ‘बर्च’ नाईट क्लब आगीप्रकरणी मोठी कारवाई; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी निलंबित

घोटगेवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून गणेश टस्करासह पाच हत्तींचा कळप वावरत आहे. मंगळवारी रात्री ८ वा. च्या सुमारास हा कळप शेतकरी गोवेकर यांच्या बागेत शिरला. त्यानंतर रात्री १ वा. पर्यंत सलग पाच तास या कळपाने बागायतीत धुडगूस घालत नुकसान केले. डोळ्यादेखत उभ्या बागायती नष्ट झाल्याचे पाहून गोवेकर यांना अश्रू अनावर झाले. शेतकरी भणगे यांच्याही बागायतीत घुसून अतोनात नुकसान केले. यात नारळ, सुपारी व केळीची झाडे उद्ध्वस्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news