गोवा : निम्स ढिल्लों खून प्रकरणातील मास्टरमाईंड जेरबंद

गोवा : निम्स ढिल्लों खून प्रकरणातील मास्टरमाईंड जेरबंद
Published on
Updated on

पणजी; पुढारी वृत्तसेवा : मार्रा-पिळर्ण येथील व्हिला प्रकल्पातील एका व्हिलाचे मालक निरोथम सिंग उर्फ निम्स ढिल्लों (७७, पंजाब) यांचा ४ फेब्रुवारीला खून झाला होता. या खून प्रकरणातील मास्टरमाईंडला शनिवारी (दि.२४) अटक करण्यात आली. कुणाल रामस्वरूप खटी (वय २४, रा.मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. तीन आठवड्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला मध्यप्रदेशमधील त्याच्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी आज (दि.२६) पत्रकार परिषदेत दिली. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे निम्स ढिल्लों हे चुलत भाऊ होते.

या आधी जितेंद्र साहू व नीतू रहुजा (रा. भोपाळ ) या दोघा संशयितांना रेंट अ कारमधील जीपीएसच्या साह्याने वाशी मुंबई येथील टोलनाक्यावर अटक करण्यात आली. नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी ही कारवाई केली होती. निम्स ढिल्लों यांच्या खुनाची घटना ४ फेब्रुवारीला सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या घरी काम करणारे कामगार कामावर आले. निम्स आपल्या बेडवर निपचित पडलेल्या अवस्थेत त्यांना दिसले. त्यानंतर त्यांचा खून झाल्याचे उघड झाले.

पोलिस अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले, तिसरा संशयित या खून प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. तो पूर्वी निम्स धिल्लो यांच्याकडे काम करायचा. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्याला सगळी माहिती होती. त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा त्याचा डाव होता. पण तो यशस्वी न झाल्याने त्याने त्यांचा खून केला. खून करून पसार झाल्यावर नवी मुंबई पोलिसांनी तिघांपैकी दोघांना अटक केली होती. तर तिसरा संशयित पोलिसांना चकवा देण्यासाठी आपली ठिकाणे बदलत होता. जवळपास तीन आठवडे आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवले होते. मध्यप्रदेशमधील काही गावांसह भोपाळमध्येही त्याचा शोध घेण्यात आला होता. तसेच कर्नाटक मधील कोलारमध्ये त्याला पकडणारच होतो, पण तो निसटला. शेवटी त्याला मध्यप्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले. पर्वरी पोलिस निरीक्षक राहुल परब आणि अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

गुन्ह्यात वापरलेल्या रेंट अ कारची नंबर प्लेट गोवा महाराष्ट्र सीमेवर सापडली आहे. यापुर्वी अटक केलेल्या दोघांकडून कारसह ढील्लो यांच्या अंगावरील सोनसाखळी आणि हातातील सोन्याचा कडा व मोबाईल या वस्तू हस्तगत करण्यात आल्या होत्या. तिसऱ्या आरोपीच्या अटकेनंतर चौकशीदरम्यान आता सर्व माहिती मिळवली जाईल आणि त्या दोघा संशयितांच्या माहितीशी पडताळणी केली जाईल असेही अक्षत कौशल म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news