Goa Siolim Thar Accident | दुचाकीस्वाराच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या मद्यधुंद गाडी चालकाला जामीन फेटाळला

Goa Siolim Thar Accident | सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल झाल्याने त्याला दिलासा देणे योग्य होणार नाही असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.
Nanded News
Nanded News : नांदेडमधील एकत्रित निविदा प्रक्रियेला हायकोर्टात आव्हानFile Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

शिवोली येथे मद्यधुंद अवस्थेत महिंद्रा थार चालवत दुचाकीला धडक देऊन दुचाकीस्वार संकेत दाभोलकर (३४) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गाडी चालक यदुकृष्णन एस. (२९) याचा जामीन अर्ज म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल झाल्याने त्याला दिलासा देणे योग्य होणार नाही असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

Nanded News
Uran Accident News: उरणमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

या प्रकरणातील संशयित यदुकृष्णन एस. हा मूळचा केरळमधील रहिवासी असून तो गेल्या काही वर्षांपासून गोव्यात वास्तव्यास आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २९ मे रोजी सकाळच्या सुमारास त्याने कथितरित्या मद्यप्राशन करून भरधाव वेगाने महिंद्रा थार वाहन चालविताना शिवोली येथील फर्नाडिस वाडा परिसरात समोरून येणाऱ्या स्कूटरला जोरदार धडक दिली.

या धडकेने दुचाकी चालक संकेत दाभोलकर व अल्पवयीन मुलाला गंभीर दुखापत झाली. या भीषण अपघातात संकेत दाभोलकर यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या दुचाकीवरील १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी मुलावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Nanded News
Sangli News : खराब रस्त्यामुळे मृत्यू झाल्यास 6 लाखांची भरपाई

अपघातानंतर हणजूण पोलिसांनी गाडी चालकाला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. संशयिताविरुद्ध सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणे वाहन चालवून मानवी जीव धोक्यात घालणे आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने अपघाताचे गांभीर्य, आरोपीविरुद्धचे प्राथमिक पुरावे आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. यानंतर म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news