Asha Bhosle Statue|गोव्यातील मंगेशीत लता मंगेशकर- आशा भोसलेंचे भव्य स्मारक उभारणार, पर्यटनमंत्र्यांची घोषणा

Tourism Minister Rohan Khaunte | मंत्री रोहन खंवटे : फर्मागुढी, मंगेशीतील प्रकल्पांची पाहणी
Rohan khawante
Rohan khawante
Published on
Updated on

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

मंगेशी येथे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या स्मरणार्थ स्मारकासह संग्रहालय उभारण्यात येणार असून, फर्मागुढी येथील छत्रपती शिवाजी महाराज किल्ला प्रकल्पाचे लोकार्पण येत्या ऑगस्ट महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

Rohan khawante
Goa Destination Wedding | दुबई-बहरीन विसरा, लग्नासाठी गोव्याला या! 'डेस्टिनेशन वेडिंग'साठी भारतीयांची गोव्याला पहिली पसंती

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी (दि.२) सरकारी अधिकारी आणि कंत्राटदारांसमवेत फर्मागुढी येथील शिवाजी महाराज किल्ला प्रकल्प तसेच मंगेशी येथील पार्किंग आणि इतर विकासकामांची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकारी केदार नाईक, कुलदीप आरोलकर, प्रमोद बदामी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

मंगेशी येथील पार्किंग परिसर आणि नव्याने उभारण्यात आलेल्या दुकान प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर खंवटे यांनी स्वच्छतागृहाचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. तसेच मंगेशीच्या भूमीत जन्मलेल्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृती जपण्यासाठी सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन एक अभिनव स्मारक आणि संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rohan khawante
Chorla Ghat Traffic | चोर्ला घाटात दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टरयुक्त सुरक्षा चिन्हांची गरज

फर्मागुढी येथील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज किल्ला प्रकल्पाचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगताना खंवटे म्हणाले की, या प्रकल्पावर कार्यरत असलेले अनेक कामगार पश्चिम बंगालमधील आहेत. तेथील निवडणुकांमुळे काही काळ कामगार आपल्या गावी गेल्याने कामास विलंब झाला होता. मात्र, आता ते परतल्याने प्रकल्पाचे काम पुन्हा वेगाने सुरू झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

शेतजमिनींना धक्का लागणार नाही : खंवटे

यावेळी मंत्री खंवटे यांनी फर्मागुढी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रकल्पासाठी आवश्यक पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून शेतजमिनींना कोणताही धक्का लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news