Male Infertility Causes | पुरुष वंध्यत्वाकडे दुर्लक्ष? प्रत्येक दोनपैकी एका प्रकरणात पुरुष घटकही कारणीभूत

Male Infertility Causes | पुरुष वंध्यत्वाकडे दुर्लक्ष महागात पडेल? 50 % प्रकरणांमध्ये पुरुष घटक कारणीभूत; तज्ज्ञांचा इशारा.
Infertility Causes
Infertility Causes AI Image
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
वंध्यत्वाचा विषय निघाला की, अनेकदा महिलांच्या तपासण्यांवर भर दिला जातो. मात्र, वैद्यकीयदृष्ट्या वंध्यत्वाच्या सुमारे निम्म्या प्रकरणांमध्ये पुरुष घटकही कारणीभूत असू शकतो, हे वास्तव अजूनही अनेकांकडून दुर्लक्षीत होत असल्याचे मत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरचे वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध वंध्यत्व निवारणतज्ज्ञ डॉ. नरहरी मळगावकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे गर्भधारणा होत नसल्यास दोन्ही जोडीदारांची एकत्रित तपासणी होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Infertility Causes
Nitin Gadkari: "मला लाज वाटते..." मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबाबद्दल नितीन गडकरींचा संताप, उद्घाटनालाही जाणार नाही

अनेक पुरुष कोणतीही लक्षणे नसल्यामुळे स्वतःची तपासणी टाळतात किंवा समस्या केवळ महिलांमध्येच असेल, असा गैरसमज करून घेतात. मात्र, शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता किंवा हालचालीतील अडचणी यासारख्या समस्या योग्य तपासण्यांद्वारे सहज निदान करता येतात. त्यामुळे उपचारांचा योग्य मार्गही लवकर निश्चित करता येतो, असे डॉ. मळगावकर यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या मते, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, ताणतणाव, अपुरी झोप, मधुमेह, हार्मोनल समस्या तसेच काही वैद्यकीय कारणांचा पुरुषांच्या प्रजनन्क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणेस विलंब होत असल्यास महिलांबरोबरच पुरुषांनीही वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Infertility Causes
Drug Mafia Yaniv Benaim | ड्रग्ज माफिया अटालाची अटक अटळ; मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा मोठा आदेश

योग्य निदान आणि आधुनिक उपचारांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी मार्ग उपलब्ध होऊ शकतो. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये पुरुष वंध्यत्वासाठी आवश्यक तपासण्या, समुपदेशन आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असून प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार उपचारांची योजना आखली जाते. वंध्यत्व ही जोडप्याची वैद्यकीय समस्या आहे. त्यामुळे दोघांनीही वेळेवर तपासणी करणे, हेच यशस्वी उपचाराचे पहिले पाऊल आहे, असा संदेश डॉ. नरहरी मळगावकर यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news