Drug Mafia Yaniv Benaim | ड्रग्ज माफिया अटालाची अटक अटळ; मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा मोठा आदेश

Drug Mafia Yaniv Benaim | 16 सप्टेंबरपर्यंत शरण येण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
goa News
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
फरारी असलेल्या ड्रग्ज माफिया संशयित इस्रायली नागरिक यानिव बेनाइम उर्फ अटाला याला १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत. त्यानंतरच त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी ऐकून घेतली जाईल, असे स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

goa News
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

अटाला याला ५ एप्रिल २०२५ रोजी शिवोली येथील त्याच्या निवासस्थानी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून ५० ग्रॅम कोकेन आणि १२० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले होते. अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याला एनडीपीएस विशेष न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता.

त्याला गोवा सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. संशयितांचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास, तसेच यापूर्वी फरार राहिल्याची नोंद लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळताना त्याला नव्याने विशेष न्यायालयासमोर अर्ज करण्याची मुभा दिली होती.

goa News
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

तसेच या अर्जावरील निर्णय होत नाही तोपर्यंत त्याला अटक न करण्याची अट उच्च न्यायालयाने घातली होती. त्यानुसार संशयित अटाला याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामिनाला अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी जोरदार विरोध केला होता.

न्यायालयाने त्याला या अर्जावरील निर्णयावेळी उपस्थित राहण्याचे निर्देश देऊनही तो हजर राहिला नव्हता. विशेष न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्यानंतर तो शिवोली येथे राहत असलेली खोली सोडून फरारी झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news