Majhe Ghar deadline extension | साडेचार वर्षांत अटल आसरा योजनेचा 5,075 जणांना लाभ

मंत्री फळदेसाई : घर दुरुस्तीसाठी दोन लाख, नव्या घरासाठी चार लाख देण्याचा विचार
Subhash Phal desai
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई
Published on
Updated on

पणजी : राज्यात गेल्या साडेचार वर्षांत ५,०७५ जणांना अटल आसरा योजनेचा लाभ मिळाला असून, घर दुरुस्ती व नवीन घर बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या कालावधीत योजनेसाठी ६५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. घर दुरुस्तीसाठी सध्या मिळणारी दीड लाख रुपयांची मदत दोन लाख, तर नवीन घर बांधण्यासाठीची तीन लाख रुपयांची मदत चार लाख रुपये करण्याचा सरकारचा विचार असल्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत सांगितले.

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून २०२२ नंतर मये मतदारसंघासह राज्यात अटल आसरा योजनेअंतर्गत मंजूर झालेला निधी व अर्जाची माहिती मागितली. बँकांशी संबंधित अडचणी दूर कराव्यात, क्षेत्रीय सर्वेक्षकांना प्रशिक्षण देऊन नागरिकांना योजनेची माहिती देण्यास सांगावे, तसेच ऑनलाइनसोबत ऑफलाइन अर्जही स्वीकारावेत, अशी मागणी त्यांनी केली.

मंत्री फळदेसाई म्हणाले, गरीब नागरिकांना घर दुरुस्ती व नवीन घर बांधण्यासाठी या योजनेतून निधी दिला जातो. पूर्वी घर दुरुस्तीसाठी ७५ हजार रुपये मिळत होते. आता ही रक्कम दीड लाख रुपये करण्यात आली आहे. आगामी काळात ती दोन लाख रुपये, तर नवीन घर बांधण्यासाठीची मदत तीन लाखांवरून चार लाख रुपये करण्याचा सरकारचा विचार आहे. मये मतदारसंघातील ४९२ अर्ज मंजूर झाले असून, आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात ५,०७५ व्यक्तींना योजनेचा लाभ मिळाल्य फळदेसाई यांनी सांगितले. साखत पर्ये, वाळपई आणि मये मतदारसंघ सर्वाधिक लाभार्थी असल्याचे त्य नमूद केले.

आमदार नीलेश काब्राल य उपप्रश्न उपस्थित करताना योजन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशा कनिष्ठ अधिकारी निर्णय असल्याचा प्रकार घडत असल्य सांगून ही तफावत दूर करण्याची माग केली.

Subhash Phal desai
Majhe Ghar deadline extension-'माझे घर'ची मुदत १८ महिन्यांनी वाढवली

निधीचा गैरवापर केल्यास वसुली

काही लाभार्थी घर दुरुस्ती किंवा बांधकामासाठी योजनेचा लाभ घेतात. मात्र, पहिला हप्ता मिळाल्यानंतर काम सुरू करत नाहीत किंवा मिळालेला निधी अन्यत्र खर्च करतात. असे आढळल्यास दिलेला पहिला हप्ता परत वसूल केला जाईल, असा इशारा फळदेसाई यांनी दिला.

Subhash Phal desai
Goa- चार पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; एकाची बदली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news