Goa- चार पोलिसांचे तडकाफडकी निलंबन; एकाची बदली

गैरवर्तन, भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर शिस्तभंगाची कारवाई
suspended
suspendedPudhari News Network
Published on
Updated on

पणजी : गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि सेवाशिस्तीचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून गोवा पोलिस खात्याने चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित, तर एकाची गोवा राखीव पोलिस दलात बदली करण्यात आली.

विधानसभेत आमदार कार्ल्स फेरेरा यांनी भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांचा पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही तडकाफडकी कारवाई करण्यात आली. गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड क्लार्क मुकुंद मेणकुरकर लामगावकर याला निलंबित केले आहे. त्याच्याविरोधात विभागीय कारवाई सुरू आहे. यूडीसी प्रताप सावंत यालाही निलंबित केले असून त्याच्याविरोधात खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे. पैसे घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

पोलिस कॉन्स्टेबल गौरेश गावस, सध्या पर्वरी पोलिस स्थानकात कार्यरत असून यापूर्वी ते वाळपई पोलिस स्थानकात नियुक्त होते. वाळपई येथे कार्यरत असताना त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याचा आरोप झाल्याने त्यांना निलंबित केले आहे. पोलिस कॉन्स्टेबल सुमेश मांद्रेकर यालाही निलंबित केले आहे. कोलवाळ पोलिस स्थानकात नोंद असलेल्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याच्या आरोपावरून ही कारवाई केली आहे.

suspended
Eco Sensitive Zone Goa | इको सेन्सिटिव्ह झोनमधून जास्तीत जास्त गावे वगळणार

सेवाशिस्तीचे उल्लंघन सहन केले जाणार नाही

पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विराज सावंत याला आल्तिन्हो गोवा राखीव पोलिस दलात पाठवले आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध पुढील विभागीय कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांनी स्पष्ट केले की, गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि सेवाशिस्तीचे उल्लंघन अजिबात सहन केले जाणार नाही

suspended
Goa Smart meters commercial users-स्मार्ट मीटर फक्त व्यावसायिकांना!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news