Madgaon Bengaluru Vande Bharat | मडगाव-बंगळुरु वंदे भारत एक्सप्रेस आजपासून

Madgaon Bengaluru Vande Bharat | नियमित सेवा रविवारपासून सुरू होणार
Madgaon Bengaluru Vande Bharat
Madgaon Bengaluru Vande Bharat
Published on: 
Updated on: 

बेळगाव (पुढारी वृत्तसेवा):

कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांमधील रेल्वे व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने बंगळुरु ते मडगाव (गोवा) दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे सेवा रविवारपासून (दि. १५) नियमित सुरू होणार आहे. मात्र, दोन्ही स्थानकांवर शुक्रवारी (दि. १३) या सभेचे उद्घाटन होणार आहे.

Madgaon Bengaluru Vande Bharat
Belagavi Session News | 5 हजार पोलीस, 800 सीसीटीव्ही; बेळगाव अधिवेशनाची तयारी सुरू

नवीन रेल्वेसेवेमुळे किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरातील प्रवाशांना जलद, आरामदायी आणि आधुनिक रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन वंदे भारत सुरू झाल्यानंतर सध्या धावणारी मडगाव-मंगळूर सेंट्रल-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (क्र. २०६४५/२०६४६) सेवा रविवारपासून दोन्ही दिशानी बंद करण्यात येणार असल्याची माहिती नैर्ऋत्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमाडी यांनी दिली.

उघाटनानिमित्त दोन विशेष वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवारी धावणार आहेत. पहिली उद्घाटन विशेष रेल्वे (क्र. ०६५१२) बंगळूरमधून दुपारी १.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे २.५५ वाजता मडगावला पोहचणार आहे. या रेल्वे श्रवणबेळगोळ, हासन, सकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, काबकापुत्तर, मंगळूर जंक्शन, उडुपी, कुंदापूर, मुकांबिका रोड बिंदूर, मुर्डेश्वर, गोकर्ण रोड आणि कारवार येथे थांबे असतील.

Madgaon Bengaluru Vande Bharat
Karnataka Politics : मंत्रिमंडळ विस्तार बेळगाव अधिवेशनापूर्वी; हेब्बाळकरांना स्थान?

रविवारपासून बंगळूर ते मडगाव दरम्यान नियमित वंदे भारत सेवा सुरू होणार आहे. रेल्वे क्र. २६६५५ ही बंगळुरुहून मडगावकडे दर बुधवारी वगळता आठवड्यातील सहा दिवस धावेल. तर रेल्वे क्र. २६६५६ ही मडगावहून बंगळूरकडे दर गुरुवार वगळता सहा दिवस धावणार आहे. रेल्वे क्र. २६६५५ बंगळूरमधून सकाळी ७.३५ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ८.५५ वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक २६६५६ मडगावहून सकाळी ८.२० वाजता सुटून रात्री ९.१५ वाजता बंगळूरला पोहचणार आहे. नवीन वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि चेअर कार अशा एकूण १६ बोगी असतील.

आज मडगावात कार्यक्रम

वंदे भारत रेल्वे गाडीची सेवा आता शुक्रवारी १३ नोव्हेंबरपासून मडगाव - बंगळूर रेल्वे मार्गावर सुरू होणार आहे. बंगळूर येथे मुख्य कार्यक्रम होणार असून त्याचा एक भाग म्हणून मडगावच्या रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दुपारी १.३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कोकण रेल्वे महामंडळाने खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, कोकण रेल्वे महामंडळाचे संचालक सुनील गुप्ता, बबन घाडगे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.