Belagavi Session News | 5 हजार पोलीस, 800 सीसीटीव्ही; बेळगाव अधिवेशनाची तयारी सुरू

Belagavi Session News | बेळगाव अधिवेशनाची तयारी सुरू; म. ए. समितीच्या प्रतिसादाची प्रतीक्षा
Belagavi Session New
Belagavi Session New
Published on: 
Updated on: 

बेळगाव (पुढारी वृत्तसेवा):

पुढील महिन्यात होणाऱ्या अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. यासाठी राज्यभरातून पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून सुवर्णसौधपासून मान्यरांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर व शहर परिसरात सुमारे ८०० सीसीटीव्ही लावले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिली. दरम्यान, २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाविरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समिती काय प्रतिसाद देते, याकडे सीमावासीयांचे लक्ष आहे.

Belagavi Session New
Karnataka Politics : मंत्रिमंडळ विस्तार बेळगाव अधिवेशनापूर्वी; हेब्बाळकरांना स्थान?

अधिवेशनाची तयारीची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त निकम यांनी बुधवारी सुवर्णसौधला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सुवर्णसौधजवळ माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, २ ते ११ डिसेंबर असे दहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे. याची पोलीस खात्यातर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे.

अधिवेशनासाठी नेमका किती बंदोबस्त हवा, याची यादी तयार केली आहे. ही यादी राज्य पोलीस खात्याला पाठवली आली आहे. यामध्ये मोबाईल कमांड सेंटरची मागणी करण्यात आली आहे. अधिवेशन काळात शहर व सुवर्णसौधपर्यंत दहा दिवस २ हजार बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत. सभापती, मंत्री, आमदार व अन्य मान्यवर ये-जा करणाऱ्या रस्त्यावर २४ तास अग्निशामक व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Belagavi Session New
Dr. B. R. Ambedkar : डॉ. आंबेडकरांनाही हवे होते बेळगाव महाराष्ट्रात

बाहेरून येणाऱ्या पोलिसांसाठी शिंदोली गावच्या परिसरात ५०० जणांना राहता येईल, असा टाऊनशिप टेंट उभारण्यात येणार आहे. शिवाय शहरातील सर्व हॉटेल्स, कल्याण मंडप व सरकारी अतिथीगृहांमध्ये मान्यवरांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जेवणाची व्यवस्था, सुसज्ज वाहनांचीही सोय करण्यात आल्याची माहितीही पोलीस आयुक्त निकम यांनी दिली.

महामेळाव्याने प्रत्यत्तर?

कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करते. यंदाही हा मेळावा आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.