Goa Tourism | विदेशात जाणाऱ्या देशी पर्यकटांची पावले गोव्याकडे

पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर; व्यावसायिक सिलिंडर मिळू लागल्याने अनेक रेस्टॉरंट सुरू, मेनू मोजकेच
Goa Tourism
Goa Tourism pudhari photo
Published on
Updated on

पणजी : अमेरिका व झाण युद्धामुळे संकटात सापडलेला गोल्याचा पर्यटन उधोग हळूहळू सावरत आहे. व्यावसाकि सिलिंडर मिळणे दुरुपास्त झाल्यामुळे अनेक रेस्टारेंट सुमारे महिन्याभर बंद राहिली होती. मात्र, आता व्यावसायिक सिलिंडर मिळू लागल्याने व अनेक रेस्टॉरेटनी कोळसा, विजेची शेगडी आदी पर्याय बापरणे सुरु केल्यानंतर बहुतांश रेस्टारेंट सुरू झाल्याची माहिती रेस्टॉरंट संघटनेचे माजी अध्यक्ष गौरीश धोंड यांनी दिली.

Goa Tourism
Goa water crisis| धरण उशाला अन् कोरड घशाला

विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली असली तरी विदेशात जाणारे भारतीय पर्यटक गोव्यात येत असल्याने देशी पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे टुरिझम व ट्रॅव्हान संघटनेचे अध्यक्ष बैंक सुद्रिजा यांनी सांगितले. अमेरिका-इराण यांच्या युध्दामुळे भारतात येणाऱ्या ईधनावर परिणाम झाला. पेट्रोमन व डिझेलनी आयात सुरू असली तरी गॅस आयातीवर बरेच निर्बंध आल्याने सुमारे महिनाभर व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा होत नव्हता, तो आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून हळूहळू सुरूझाला आहे. मात्र पूर्वी सहज उपलब्ध होणारे सिलिंडर आता काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळत असल्याने अनेकांनी केळसा, लाकडे किया विजेवरील शेगड्या वापरण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात सध्या देशी पर्यटकांची संख्या वाढलेली असूर उकाडा वाढल्याने संख्याकाळच्या वेळी देशी पर्यटकासह स्थानिक नागरिकही समुद्रकिना-यावर समुद्र स्थानांचा आनंद घेताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. राज्यांतील रेस्टारेंट चालकांना आता व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत आहेत. काहींनी स्वयंपाकासाठी पर्यायी उपाय शोधले आहेत. कोळसा, लाकडे यासह विजेकील शेगड्या वापरल्या जात.

Goa Tourism
New Casino in mandovi Goa | नव्या कॅसिनोला मांडवीत प्रवेश देण्यास विरोध

विदेशी पर्यटक रोडावले...

विदेशी पर्यटकानी अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासह अन्य देशातील दौरे स्थगित केले आहेत. विमानांची वाहतूक अद्याप पूर्ण सुरळीत झालेली नाही. त्याचाही परिणाम विदेशी पर्यटकांवर झाला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे विदेशी पर्यटक पर्यटन स्थळांवर दिसत नाहीत.

विदेशाऐवजी गोवा पर्याय...

इराण व अमेरिका युद्धाचा मरिणाम म्हणून गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली असली तरी विदेशात पर्यटनासाठी जाणारे अनेक देशी पर्यटक गोव्यात येत आहेत. त्यामुळे गोव्यात देशी पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. सर्व रेस्टॉरंट हळूहळू सुरू झाले आहेत, असे टुरिस्ट अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचे अध्यक्ष जंक सुखीजा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news