Goa water crisis| धरण उशाला अन् कोरड घशाला

दुलबानगर, कष्टी ग्रामस्थांची व्यथा; ५५ वर्षांनंतरही पाण्याची समस्या कायम
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

मडगाव : सगिवासीयांच्या त्यागामुळे साळावली धरण अस्तित्वात आले. या धरणाच्या पाण्यामुळे अध्र्ध्या गोव्याची तहान भागते. मात्र, त्याच धरणाच्या सावलीत आणि अवच्या काही किलोमीटर अंतरावर सावर्डे मतदारसंघातील दुलबानगर आणि कष्टी येथील रहिवाशांचा घसा मात्र आजणी पाण्यासाठी कोरडाच आहे. एका बाजूला धरणातील पाण्याचा अथांग साता आणि दुसत्या बाबूला टँकरच्या गढूळ पाण्यासाठी हाबलपणे रांगा लावणारे नागरिक, अशी ही विदारक स्थिती शासनाच्या विकासाच्या दाव्यांनाच छेद देणारी ठरत आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी दररोज संघर्ष करणाऱ्या या कुटुंचांचे जगणे अक्षरशः टँकरवर अवलंबून झाले असून, परण उशाला, पण कोरड घशाला असणारी ही शोकांतिका अधिक तीव्रतेने समोर येत आहे.

Water Crisis
Goa Off the record |ऑफ दि रेकॉर्ड....

सांग तालुक्यातील नागरिकांनी साळवली धरण उभारणीसाठी आपल्या जमिनी आणि बरे देत मोठा त्याग केला आहे. या त्यागामुळे आज गोव्याच्या मोठ्या भागाला कृषी आणि घरगुती वापरासाठी मुबलक पाणी मिळत आहे. मात्र, हा संदर्भ देत सावर्डे मतदारसंघातील दुलबानगर आणि कष्टी येथील रहिवाशांनी आपली व्यथा मांडली, ज्यांच्या त्यागामुळे राज्याला पाणी मिळते, त्या धरणाच्या जवळच असलेल्या आमाला मात्र आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

दुलबानगरपासून अवघ्या दोन किलोमीटरवरून झुआरी नदी वाहते. श्रीही येथील ग्रामस्थांना गेल्या ५५ वर्षांपासून टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रस्तावित बंधारा प्रकल्पातून या गावांना पाणी मिळण्याची आशा होती. मात्र, काही ठिकाणी झालेल्या विरोधामुळे प्रकल्प रद्द करण्यात आला त्याचचरोबर दुलचानगर आणि कष्टीसाठी प्रस्तावित लहान पाणीपुरवठा योजनेलाही फटका बसला, अशी माहिती भानुदास नाईक्यांनी दिली. गामातील नागरिकांना आजही पिण्यासाठी, शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. भरातील समारंभ असी किवा सार्वजनिक कार्यक्रम दोन ते पाच हजार रुपये खर्च करून टेंकर मागवावे लागतात.

Water Crisis
New Casino in mandovi Goa | नव्या कॅसिनोला मांडवीत प्रवेश देण्यास विरोध

आठवड्यातून दोन वेळा टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा अपुरा ठरत असून, अनेक कुटुंबांना अतिरिक्त खर्च करून पुन्हा टेंकर मागवावे लागतात, टँकामधील पाणी गढूळ आणि अस्वच्छ असल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. लहान मुले आणि वृद्धांना विशेषतः याचा फटका बसत आहे. शेतीप्रधान असलेल्या या भागात पाण्याअभावी बागायती ओसाड पडू लागल्या आहेत. जनावरांसाठीही पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे.

लईराईच्या धोंडांनाही पाणीटंचाईचा फटका

डिचोली: साबरघाट येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून शिरगावच्या श्री देवी ईराईचे ११० बीडांनाही या पाणीटंचाईचा फटका बसत आहे. सोमवारी दुपारी धोंडांनी डिचोली येथील पाणीपुरवठा विभागाला भेट दिली, त्यावेळी साहायक अभियंता उपस्थित नसल्याचे त्यांना कळले. त्यांनी आपले निवेदन विभागाकडे सादर करून पाणीटंचाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी केली आहे. सध्या गावात आठवड्यातून फक्त एकदाच पाण्याचा टैंकर येतो, टैंकर चालकाकडे विचारणा केल्यास ती उढलाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. आठवड़धातून एकदाच येणाऱ्या टँकरवर संपूर्ण गावाचा उदरनिर्वाह कसा चालणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. गेल्या आठवडाभरापासून गावात पाण्याचा तुटवडा असून, पिण्याच्या पाण्यासाठी गावक-यांची मोठी धडपड सुरू आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात विभागाला रीतसर निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांचा शेरा देखील होता. तरीही विभागाने कोणतीही दाखल घेतली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

प्रश्न सुटतच नाही

नाईक ग्रामस्थ भानुदास नाईक यांनी सांगितले, आम्ही ५५ वर्षापासून येथे राहतो. सेती अयो, कृषी कार्ड आहे, पण पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. विहिरी आटत आहेत. आम्ही अनेकदा निवेदन सादर केली, पण प्रश्न सुटत नाही,

गढूळ पाण्याने बिघडतेय आरोग्य...

सुमित्रा नाईक यांनीही संताप व्यक्त करताना आठवडयातून दोनदा टैंकर वेतो, पण ते पाणी पुरेसे नसते. आम्हाला आणखी पैसे खर्च करून टैंकर मागबाबा लागतो. गहूळ पाणी पिउल आरोग्य बिघडत असल्याचे त्या म्हणाले.

प्रसंगी आंदोलन करणार

नाईक पंच संजय नाईक यांनी स्पष्ट केले की, गोला मिनरल फंडातून पाण्याची टाकी उभारून नदीचे पाणी गावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रस्ताव होता. मात्र, जमिनीच्या ना हरकत दाखल्यांतील त्रुटींमुळे हा प्रस्ताव गेली दोन वर्षे अडकून पडला असून आता रह होण्याच्या मार्गावर आहे. काही विरोधकांच्या भूमिकेमुळे संपूर्ण गावाला पाण्यापासून वंचित ठेवणे योग्य नाही. दुलबानगर आणि कष्टी येथील लोकांना पाणी मिळावे यासाठी आम्ही ग्रामसभेट हा विषय मांडला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहोत. गरज पडल्यास आंदोलन छेडले जाईल, असेही ते म्हणाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news