New Casino in mandovi Goa | नव्या कॅसिनोला मांडवीत प्रवेश देण्यास विरोध

इनफ ईज इनफच्या वतीने याचिकाही दाखल
Casinos
Casinos file photo
Published on
Updated on

पणजी : नौकानयनातील धोक्यामुळे मांडवी नदीत नव्या महाकाय कॅसिनोला प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये, असे आवाहन आम्ही पणजीकर अगेन्स्ट कॅसिनोज या सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघटनेने बंदर प्रमुखांना केले.

Casinos
Goa off the record | रस्ता काय तुमच्या वडिलांचा...!

पणजी येथील आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत, माजी नगरसेविका पॅट्रिशिया पिंटो आणि सबीना मार्टिन्स यांनी सांगितले की, ११२ मीटर लांबीच्या कॅसिनो जहाजाला मांडवी नदीत (पणजी बंदर क्षेत्र) प्रवेश देण्यामध्ये अनियमितता आढळून आली आहे.

माहिती अधिकार कायद्यान्वये (आरटीआय) त्यांना अशी माहिती मिळाली आहे की, कॅसिनो जहाजाला सध्याच्या सुमारे ६० मीटर लांबीच्या जहाजाच्या जागी ११२ मीटर लांबीची बोट आणण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. बोटीला दिलेली मंजुरी बेकायदेशीर आहे आणि ते तत्काळ रद्द/मागे घेतले पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. त्यांच्या मते, तांत्रिक समितीने स्पष्टपणे सांगितले होते की, नवीन बोटीचा आकार ११२ मीटर असून तो ९० मीटरच्या अनुज्ञेय मयदिपेक्षा खूप जास्त असल्याने, बोटीचा प्रवेश हा नौकानयनासाठी धोकादायक आहे. ९० मीटर ते १२० मीटरची अनुज्ञेय लांबी गोव्याला लागू नाही, परंतु इतर राज्यांना लागू आहे.

Casinos
Goa Off the record |ऑफ दि रेकॉर्ड....

नौकानयनाच्या सुरक्षिततेसाठी, कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभागाने जहाजांची लांबी ९० मीटरपर्यंत मर्यादित केली होती. तथापि, वळणांवर आणि पुलांजवळ नौकानयनातील धोके टाळण्यासाठी बहुतेक जहाजांनी आपली लांबी ७० मीटरपर्यंत मर्यादित केली आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news