Hindu Rashtra Establishment | हिंदू राष्ट्र स्थापनेच्या ध्येयासाठी एकत्र या

Hindu Rashtra Establishment | संतोष रिवणकर यांचे आवाहन; पणजीत हिंदू जनजाग्रुतीतर्फे स्नेहमेळावा
Hindu Rashtra Establishment
Hindu Rashtra Establishment
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय समोर ठेवून गोव्यातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकविचाराने आणि एकत्रितपणे कार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ अधिवक्ता संतोष रिवणकर यांनी केले. हिंदू जनजागृती समितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पणजीतील हॉटेल डेल्मन येथे आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

Hindu Rashtra Establishment
Floating Casinos Panajim | तरंगत्या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाढती वाहतूक कोंडी; उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश

हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असलेल्या हिंदू जनजागृती समितीने नवरात्रीच्या घटस्थापनेदिवशी रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि गोवा राज्य संघटक सत्यविजय नाईक उपस्थित होते.

शंखनाद आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. समितीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. समितीच्या स्थापनापासून कार्यात सहभागी असलेल्या हिंदुत्वनिष्ठांचा सत्कारही करण्यात आला.

Hindu Rashtra Establishment
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

रिवणकर यांनी गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळण्याची आवश्यकता व्यक्त केली. मराठी प्राथमिक शाळा बंद पडल्याने संस्कृतीच्या जतनाचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
रमेश शिंदे यांनी समितीच्या कार्याची तुलना मण्यांच्या गुंफणाऱ्या माळेतील दोऱ्याशी केली.
सत्यविजय नाईक यांनी समितीच्या २५ वर्षातील कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राहुल वझे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news