Floating Casinos Panajim | तरंगत्या कॅसिनोंमुळे पणजी शहरात वाढती वाहतूक कोंडी; उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश

Floating Casinos Panajim | उच्च न्यायालयाचे सरकारला तातडीने उपाययोजना, कारवाईचा आदेश
Casinos
Casinos file photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राजधानी पणजीतील तरंगत्या कॅसिनोंमुळे वाढत्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारी प्रशासनाला तातडीने उपाययोजना व कारवाईचे निर्देश दिले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर होणारी बेशिस्त पार्किंग, पर्यटक व कॅसिनोंमध्ये जाणाऱ्या वाहनांची गर्दी तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे वाहतूक व्यवस्थाऱ्यावर मोठा ताण येत असल्याचे न्यायालयाच्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

Casinos
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

विशेषतः दयानंद बांदोडकर मार्ग (डी.बी. मार्ग) आणि एम.जी. रोड परिसरातील वाहतूक व्यवस्थाबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. तरंगत्या कॅसिनोंमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे या भागातील पार्किंग आणि वाहतुकीची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

अलीकडे सलग सुट्ट्यांच्या काळात कॅसिनो परिसराकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे डी.बी. बांदोडकर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

कॅसिनोमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना सोडण्यासाठी येणाऱ्या टॅक्सी आणि खाजगी वाहनांकडून रस्त्याच्या कडेला, तसेच उपलब्ध पार्किंग जागांमध्ये अनियंत्रितपणे वाहने उभी केली जात असल्याने स्थानिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डबल पार्किंग आणि नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करण्याच्या प्रकारामुळे रस्त्याची प्रत्यक्ष वाहतूक क्षमता कमी होत असल्याचे निदर्शनास आले.

पादचाऱ्यांच्या सुरक्षेलाही धोका:

वाहतूक कोंडीसोबतच पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग आणि रस्ता ओलांडण्याच्या सुविधांचा अभाव हादेखील गंभीर मुद्दा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. शहरातील गर्दीच्या भागात वाहनांची वाढती संख्या आणि बेशिस्त पार्किंगमुळे पादचाऱ्याना रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने मार्ग काढावा लागत आहे.

Casinos
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

पणजीच्या सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्यातही कॅसिनो परिसराशी जोडणाऱ्या पादचारी मार्गाचा विकास, योग्य प्रकाश योजना आणि पार्किंगचा ताण कमी करण्यासाठी बहुमजली पार्किंगमधून कॅसिनोकडे पादचारी जोडणी करण्याची आवश्यकता न्यायालयाने व्यक्त केली.

बेशिस्त पार्किंगवर कठोर कारवाई करणे, नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि कॅसिनो परिसरातील वाहनांची ये-जा नियंत्रित करण्यासाठी आवश्यक नियोजन करणे, अशा उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. गोवा वाहतूक विभागानेही बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी वाढत असल्याचे नमूद केले.

दरम्यान, पणजीतील कॅसिनो वाहतूक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या इतर समस्यांचा मुद्दा यापूर्वी विधानसभा उपस्थित झाला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्षात कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे पणजीवासीयांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news