Vagator restaurants seals : वागातोरमधील तीन रेस्टॉरंट्सना सील

४० लाखांच्या थकीत भाडेकरारामुळे पर्यटन महामंडळाची कारवाई
Vagator restaurants seals
वागातोरमधील तीन रेस्टॉरंट्सना सीलpudhari photo
Published on
Updated on

पणजी : थकीत भाडेकराराच्या रकमेपोटी वागातोर येथील तीन उच्च दर्जाच्या रेस्टॉरंटस्ना गोवा पर्यटक विकास महामंडळाने (जीटीडीसी) सील ठोकले आहे. सुमारे ४० लाख रुपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जीटीडीसीच्या मालकीच्या जमिनीवर ही रेस्टॉरंट् चालवली जात होती. गेल्या २० फेब्रुवारी २०२६ रोजी भाडेकरार रद्द केल्यानंतर महामंडळाने संबंधित जागेचा ताबा परत घेतला आणि आस्थापनांना सील केले, वरिष्ठ जीटीडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित व्यावसायिक अनुभव शर्मा यांनी अनेक महिन्यांपासून भाडे देणे थांबवले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर करार रद्द करून जागेचा ताबा घेण्यात आला. थकबाकीची रक्कम ४० लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.

Vagator restaurants seals
MLA Vijay Sardesai : खासगी क्षेत्रात ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांसाठी विधेयक सादर

महामंडळाच्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, करार हा केवळ शर्मा यांच्यासोबत होता. त्यांनी इतर रेस्टॉरंट मालक किंवा कर्मचाऱ्यांशी केलेल्या व्यवस्थेबाबत जीटीडीसी जबाबदार नाही.

करारातील अटींनुसार थकबाकी झाल्यास जागा परत घेण्याचा अधिकार महामंडळाला आहे. सील केलेल्या जागांवर जीटीडीसीने नोटिसा लावल्या असून, सर्व कायदेशीर बाबी निकाली निघाल्यानंतर ही मालमत्ता पुन्हा निविदा प्रक्रियेद्वारे देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Vagator restaurants seals
Nashik tree authority budget : वृक्षप्राधिकरणासाठी २५ कोटींचे अंदाजपत्रक

कामगारांवर बेरोजगारीची कुन्हाड...

या कारवाईमुळे अनेक कामगारांना अचानक बेरोजगार व्हावे लागले आहे. आम्हाला कोणतीही पूर्वसूचना किंवा नुकसानभरपाई न देता जागा सील करण्यात आली. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. हे बेरोजगार नव्या नोकरीच्या शोधात आहेत असे सील झालेल्या रेस्टॉरंटस्मधील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news