MLA Vijay Sardesai : खासगी क्षेत्रात ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांसाठी विधेयक सादर

आमदार विजय सरदेसाई यांची माहिती
Goa legislative assembly bill 2026
MLA Vijay Sardesaipudhari photo
Published on
Updated on

पणजी : गोव्यात खासगी क्षेत्रातील आस्थापनांमध्ये ८० टक्के नोकऱ्या स्थानिक गोमंतकीयांसाठी तरतूद करणारे गोवा स्टेट एम्प्लॉयमेंट ऑफ लोकल कैंडिडेटस् बिल, २०२६ गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सादर केले.

राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देणे आवश्यक आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक प्रकल्पांना परवानग्या देताना गोव्यातील स्थानिकांना रोजगार देण्याची अट बंधनकारक करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी या विधेयकात केली आहे.

Goa legislative assembly bill 2026
Nashik Krushikumbh 2026 : कृषी विभागातर्फे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा ‌‘कृषिकुंभ 2026‌’

गोव्यातील खासगी कंपन्या, उद्योग, व्यावसायिक आस्थापने आणि मोठे प्रकल्प यांना एकूण नोकरभरतीपैकी किमान ८० टक्के पदे स्थानिक उमेदवारांनी भरावी लागतील. जर आवश्यक कौशल्य असलेले स्थानिक उमेदवार उपलब्ध नसतील, तर संबंधित कंपन्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्थानिकांना आवश्यक कौशल्ये देण्याची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी या विधेयकात तरतूद केली आहे.

सरदेसाई यांनी सांगितले की, गोव्यातील जमीन, पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून उद्योग चालवले जातात. त्यामुळे त्या उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य मिळणे हा त्यांचा हक्क आहे. विधेयकात अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची, नोंदणी व देखरेख यंत्रणा उभारण्याची तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे.

Goa legislative assembly bill 2026
Nashik News : अनियमित पाणीपुरवठा, खड्ड्यांसंदर्भात शुक्रवारी विशेष महासभा

या विधेयकावर आगामी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता असून, ते मंजूर झाल्यास खासगी क्षेत्रातील भरती प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उद्योगक्षेत्र आणि व्यावसायिक संघटनांकडून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news