Goa - गोव्याच्या 'गोमांचली' म्हशीची राष्ट्रीय नोंदणी

Gomanchali buffalo national recognition - देशातील मान्यताप्राप्त देशी पशुजातींच्या यादीत समावेश
Goa - गोव्याच्या 'गोमांचली' म्हशीची राष्ट्रीय नोंदणी
Published on
Updated on

पणजी : स्थानिक पशुधनासाठी महत्त्वपूर्ण मानली जाणारी गोव्याची 'गोमांचली' म्हैस आता देशातील अधिकृत मान्यताप्राप्त देशी म्हशीची जात ठरली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरोने या जातीच्या नोंदणीला मंजुरी दिल्याने गोमांचली म्हशीला राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

Goa - गोव्याच्या 'गोमांचली' म्हशीची राष्ट्रीय नोंदणी
Goa halts peepal tree plantation - हमरस्ता दुभाजकात पिंपळाची रोपे लावण्याची मोहीम स्थगित

ब्युरोचे संचालक डॉ. एन. एच. मोहन यांनी गोव्याच्या पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाच्या संचालकांना पाठविलेल्या पत्रातून ही माहिती दिली आहे. गोमांचली म्हैस गोव्याची स्थानिक जात म्हणून नोंदविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

जाती नोंदणी समितीच्या ७ऑगस्ट रोजी झालेल्या १४व्या बैठकीत या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. समितीने गोमांचली म्हशीची नवी देशी जात म्हणून नोंदणी करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे देशातील मान्यताप्राप्त देशी पशुजार्तीच्या यादीत गोमांचली म्हशीचा समावेश झाला आहे.

नोंदणीमध्ये गोमांचली म्हशीचे 'होम ट्रॅक्ट गोवा' असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या म्हशीची स्थानिक उत्पत्ती आणि पारंपरिक भौगोलिक क्षेत्र म्हणून गोव्याला अधिकृत मान्यता मिळाली आहे. अर्जदार म्हणून डॉ. अमिया रंजन साहू, डॉ. शिरीष डी. नरनवरे, डॉ. गोकुलदास पी. पी., डॉ. निवेदिता नायक आणि डॉ. संजयकुमार उधवार यांच्यासह संबंधित शास्त्रज्ञांची नावे नोंदविण्यात आली आहेत.

Goa - गोव्याच्या 'गोमांचली' म्हशीची राष्ट्रीय नोंदणी
Goa - राज्यात 16 मतदारसंघांत आमदार सुरक्षित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news