Goa - राज्यात 16 मतदारसंघांत आमदार सुरक्षित

खरी लढत 24 मतदारसंघांतच : भाजपचे 13, मगो, गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार सुरक्षित
Goa - राज्यात 16 मतदारसंघांत आमदार सुरक्षित
Published on
Updated on

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

विधानसभा निवडणुका अवघ्या पाच महिन्यांवर आलेल्या असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे. विरोधक मात्र अद्यापही युती करावी की नाही या संभ्रमात दिसतात. सद्यस्थितीत राज्यातील सर्व ४० मतदारसंघांतील स्थितीचा विचार करता १३ मतदारसंघांतील भाजपचे आमदार सुरक्षित असल्याचे दिसते. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व मगो पक्षाचा प्रत्येकी एक आमदार सुरक्षित आहे. हे १६ मतदारसंघ वगळल्यास खरी लढत ही उर्वरीत २४ मतदारसंघांतच होणार आहे.

ज्या आमदारांचे मतदारसंघ सुरक्षित दिसत आहेत त्यात विश्वजित राणे, डॉ. देविया राणे, डॉ. प्रमोद सावंत, मायकल लोबो, रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, ताळगाव मतदारसंघ, सुभाष तवडकर, गणेश गावकर, दिगंबर आमदारांसह मगोचे सुदिन ढवळीकर फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांच्या २०१२ पासून सत्तेत असलेल्या भाजपने गोव्यामध्ये विकासकामे केलेली आहेत.

नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर गोव्याला भरीव विकास निधी मिळाला आणि त्याचाच लाभ घेत डबल इंजिन सरकारने राज्यात अनेक विकास प्रकल्प उभे केले. जुवारी नदीवरील पूल, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुपर स्पेशालिटी इस्पितळ यासह विविध महाविद्यालयांच्या इमारती, पत्रादेवी ते पोळे राष्ट्रीय महामार्ग बांधणी असे प्रकल्प गोव्यात सरकारने विविध योजनांचा लाभगोवेकरांना दिला आहे.

Goa - राज्यात 16 मतदारसंघांत आमदार सुरक्षित
Chhatrapati Shivaji Maharaj statue relocation | छ. शिवरायांचा पुतळा स्थलांतरसाठी जागा निश्चितीस २५ ऑगस्टपर्यंत मुदत

लाडली लक्ष्मी, गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, दीनदयाळ स्वास्थ योजना अशा अनेक योजनांचा लाभ गोवेकर घेत आहेत. त्यामुळेच पंचायत, पालिका आणि त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये गोवेकर भाजपच्या मागे उभे राहिल्याचे दिसून आले. भाजपची पक्ष संघटना मजबूत असल्याने हा पक्ष नेहमीच निवडणुकीच्या तयारीत दिसतो.

दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची संघटना कमजोर आहे. आजी-माजी प्रदेशाध्यक्षांमध्ये खोटे कोण बोलतोय. यावर वाद सुरू झालेत. सर्व विरोधकांनी आघाडी केल्यास विरोधी पक्षांना संधी आहे, मात्र काँग्रेस युतीबाबत संभ्रमात आहे.

Goa - राज्यात 16 मतदारसंघांत आमदार सुरक्षित
Goa education officials contempt notice-शिक्षण संचालकांसह तिघांना अवमान नोटीस

हल्लीच गोव्यात येऊन गेलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही युतीबाबत सहकारी पक्षांसोबत चर्चा केली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत तिरंगी किंवा चौरंगी लढती झाल्यास त्याचा फटका बसेल, हे निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news