Dodamarg Knife Attack | गोव्यातील तरुणाकडून दोडामार्गमध्ये चाकू हल्ल्याचा प्रयत्न

Dodamarg Knife Attack | कसई दोडामार्ग नगराध्यक्षांच्या भावासह एकावर जीवघेणा हल्ला
Knife Attack
Knife AttackPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील तरुणाकडून दोडामार्गमध्ये स्थानिकांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मांगेली येथे वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाकडून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. गोवा-महाराष्ट्र सीमेलगतच्या दोडामार्ग शहरात सलग दुसऱ्या रविवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे.

Knife Attack
Crime News | कशासाठी? गर्लफ्रेंडसाठी!

दोडामार्ग बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीत तरूणीसह संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका तरूणाला रोखण्याचा प्रयत्न करणान्या दोन स्थानिक तरूणांवर त्या तरुणाने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Knife Attack
Sangli Crime : सांगली जिल्ह्यात गुंडांच्या टोळ्यांत पुन्हा भडका

मिळालेल्या संबंधित GA-07-E-6051 माहितीनुसार, तरूण-तरूणी कारमधून दोडामार्गात गेले होते. त्यांच्याकडून निर्माणाधीन इमारतीत सुरू असलेला आक्षेपार्ह प्रकार लक्षात आल्यानंतर स्थानिक तरूणांनी त्यांना जाब विचारला. यावेळी झालेल्या वादातून संबधित तरूणाने चाकू काढून कसई दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या भावासह आणखी एका तरूणावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news