Goa Water Crisis | सरकार 24 तास पाणी देण्यात अपयशी

Goa Water Crisis | युरी आलेमाव : 'हर घर जल'ची जाहिरात, वस्तुस्थिती वेगळी
Goa Water Crisis | सरकार 24 तास पाणी देण्यात अपयशी
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

नळजोडणीद्वारे दरदिवशी २४ तास पिण्याचे पाणी पुरवण्याचे सतत आश्वासन देऊनही सरकार पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गुरुवारी केली. ते विधानसभेच्या अधिवेशनात शून्य प्रहरादरम्यान बोलत होते. त्यांनी सांगितले की, राज्यात पाणीपुरवठ्याची मोठी कमतरता आहे.

Goa Water Crisis | सरकार 24 तास पाणी देण्यात अपयशी
Goa Traffic Rules | हेल्मेट सक्तीच्या नियमासाठी मुदत देणार : मंत्री गुदिन्हो

सरकारने 'हर घर जल' योजनेची मोठी जाहिरात केली; पण आजची परिस्थिती वेगळी आहे. पाणी हा संविधानिक हक्क आहे. प्रत्येकाला ते मिळालेच पाहिजे. प्रक्रिया केलेल्या पाण्याची दैनंदिन मागणी सुमारे ६४५ एमएलडी आहे; परंतु प्रत्यक्ष उत्पादन आणि पुरवठा ८०-८५ एमएलडीने कमी आहे.

या तुटवड्यामुळे अनेक कुटुंबांना अनियमित पाणीपुरवठा होतो आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते," असेही आलेमाव म्हणाले. ते म्हणाले की, अनेकदा होणारा पाणीपुरवठा खंडित होणे हे जुन्या पायाभूत सुविधा आणि पाईपलाईन निकामी झाल्यामुळे घडते.

Goa Water Crisis | सरकार 24 तास पाणी देण्यात अपयशी
CM Pramod Sawant| हडफडे दुर्घटनेतील दोषी सुटणार नाहीत

जून २०२५ मध्ये ओपा आणि अंजुना येथे पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा खंडित झाला होता आणि दुरुस्तीनंतर विलंबानंतरच पाणीपुरवठा पूर्ववत झाला. याव्यतिरिक्त, जुन्या पाईपलाईन नेटवर्कची दुरुस्ती करण्यासाठी नियमितपणे पाणीपुरवठा बंद करावा लागतो, त्यामुळे पुरवठ्याची अनिश्चितता वाढते. रिअल टाइम देखभाल आणि देखरेख प्रणालीच्या अभावामुळे पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना अधिकच वाढतात," असे ते म्हणाले.

राज्याची वहन क्षमता निश्चित करा...

आलेमाव म्हणाले, नगर आणि ग्राम नियोजन विभाग पाणी उपलब्धतेचे किंवा पायाभूत सुविधांवरील भाराचे समवर्ती मूल्यांकन न करताच उच्च घनतेच्या गृहनिर्माण आणि पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देत आहे. त्यामुळे पणजी, मुरगाव आणि शिवोली सारख्या भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर होत आहे. सरकारने राज्याची वहन क्षमता निश्चित केली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news