Goa News : सचिव बैठकीला गैरहजर राहिल्याने बार्देश पंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

Goa News : सचिव बैठकीला गैरहजर राहिल्याने बार्देश पंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
Published on
Updated on

म्हापसा: पुढारी वृत्तसेवा : बैठकीची नोटीस काढूनही पंचायत सचिव बैठकीला हजर न राहिल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी वेर्ला – काणका, बार्देश पंचायतीला टाळे ठोकले. Goa News

याबाब अधिक माहिती अशी की, वेर्ला- काणका पंचायतीच्या सचिव निकिता परब यांनी आज (दि.१८) पंचायतीतील विविध समित्यांची बैठक बोलावली होती, तशी त्यांनी नोटीस काढली होती. त्याप्रमाणे या समित्यांचे पदाधिकारी, सदस्य व पंचायत मंडळ बैठकीसाठी पंचायतीच्या सभागृहात जमा झाले होते. परंतु दुपारचे बारा वाजले तरी पंचायत सचिव निकिता परब या पंचायत गृहात फिरकल्या नाहीत. सरपंच अनिता चारी यांनी पंचायत सचिव कार्यालयात गैरहजर असल्याची माहिती बार्देशचे गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास यांना दिल्यावर त्यांनी निकिता परब या रजेवर असल्याचे सांगितले.  Goa News

त्या जर रजेवर गेल्या, तर त्या जागी दुसऱ्या पंचायत सचिवांना या बैठकीसाठी पाठवणे गरजेचे असताना कोणीही न आल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पंचायतीला टाळे ठोकण्याचा पवित्रा घेतला.

दरम्यान, पंचायतीच्या सचिवांनी पंचायत मंडळास विश्वासात न घेता परस्पर एक ना हरकत दाखला दिला आहे. या कारणाने पंचायतीने त्यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. परंतु पंचायतीला अद्याप कळवण्यात आलेले नाही, असे सरपंच चारी यांनी सांगितले. जर त्यांची बदली झाली असेल, तर दुसऱ्या पंचायत सचिवांची नियुक्ती व्हायला हवी होती, तसेही झाले नाही आणि या पंचायत सचिव गैरहजर राहतात. त्यामुळे पंचायतीची कामे खोळंबली असल्याचे सरपंचांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news