Goa AI Traffic Cameras | गोव्याच्या रस्त्यांवर आता 'एआय'ची नजर! वाहतूक शिस्तीसाठी राज्यभरात 100 स्मार्ट कॅमेरे बसवणार

Goa AI Traffic Cameras | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
AI Cameras Security
AI Cameras SecurityPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी १०० एआय कॅमेरे राज्यभरात लावले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गेल्या काही वर्षांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

AI Cameras Security
Panaji Municipal Election 2026| महापालिकेचा जाहीर प्रचार आज संपणार

यातून अपघातांचे आणि अपघातात बळी किंवा जखमी होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सरकार, पोलिस आणि वाहतूक विभाग प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यात १०० एआय कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावर्षीपासून गोवा डिजिटल टॅक्सी धोरण राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच पीपीपी तत्त्वाखाली ७४५ कोटी रुपये खर्चुन म्हापसा, मडगाव व वास्कोतील बस टर्मिनलचा पुनर्विकास करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

AI Cameras Security
Goa Road Maintenance | फॉर्म्युला 4 सर्किट रेससाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करा

राज्यात वाहनांच्या तपासणीसाठी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स यंत्रणा उभारली जाईल, तसेच माझी बस योजना चालूच ठेवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कदंबच्या १३७ बसेस खरेदी करणार

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी २५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कदंब महामंडळासाठी १३७ बसगाड्या खरेदी करणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news