Goa Road Maintenance | फॉर्म्युला 4 सर्किट रेससाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करा

Goa Road Maintenance | आमदार संकल्प आमोणकर यांची विधानसभेत मागणी
Goa Road Maintenance
Goa Road Maintenance
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

फॉर्म्युला ४ सर्किट रेससाठी राष्ट्रीय महामार्ग ५६६ चे खोदलेले रस्ते व पदपथ पूर्ववत करण्यात न आल्याबद्दल मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सदर रस्ते, पदपथ, गटारे पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी रहिवाशांकडून होत होती.

Goa Road Maintenance
Free Health Checkup | 40 वर्षांवरील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

आमोणकर यांनी सदर प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. बोगदा येथे फॉर्म्युला ४ सर्किट रेस होणार होती. तथापी तेथील रहिवाशांचा विरोध झाल्याने ती रेस रद्द करण्यात आली. त्यानंतर सदर रेस मोपा येथे घेण्यात आली. मात्र, रेससाठी रस्त्याकडचे गटारे, पदपथ तसेच रस्ते खोदण्यात आले होते.

Goa Road Maintenance
Panaji Municipal Election 2026| महापालिकेचा जाहीर प्रचार आज संपणार

मुरगाव पालिकेने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तेथे नव्याने गटारे बांधली होती. त्या सर्वाची मोडतोड करण्यात आली. तेथील रेस रद्द करण्यात आल्यावर ते रस्ते, गटारे, पदपथ पूर्ववत करण्याची गरज होती. मात्र, गटारांची मोडतोड करण्यात आल्याने सिमेंट काँक्रीटखालील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. याप्रकरणी आमदार आमोणकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news