Panaji Municipal Election 2026| महापालिकेचा जाहीर प्रचार आज संपणार

Panaji Municipal Election 2026| प्रोग्रेसिव्ह पणजी-आम्ही पणजीकरमध्ये काँटे की टक्कर
Panaji Municipal Election 2026
Panaji Municipal Election 2026
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिकेसाठी बुधवारी दि.११ रोजी मतदान होणार आहे, त्यासाठीचा जाहीर प्रचार उद्या सोमवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे, आत्तापर्यंतच्या प्रचाराचा विचार केल्यास अप्रोग्रेसिव्ह पणजी व आम्ही पणजीकर या दोन्ही पॅनलमध्ये अटतटीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Panaji Municipal Election 2026
Free Health Checkup | 40 वर्षांवरील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे मतदार घरी असल्याची संधी साधून दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील प्रोग्रेसिव्ह पणजी पॅनलची सत्ता गेली अनेक वर्षे महापालिकेत आहे.

या पॅनलने यावेळीही ३० ही प्रभागात उमेदवार उभे केले असून उत्पल मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आम्ही पणजीकर पॅनलतर्फेही सर्व ३० प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. काही ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

तब्बल १७ जागा एकास एक लढत होणार आहे. पहिल्यांदाच मोन्सेरात यांच्या पॅनेलला पर्रीकर यांच्या पॅनलने कडवे आव्हाने उभे केले आहे. भाजपात असलेले व विचारसरणी असलेले नेते सध्या भाजापत असलेले मंत्री बाबूश मोन्सेरात आणि भाजपची विचारसरणी असलेले व अन्य पक्षांनी पाठिंबा दिलेले उत्पल पर्रीकर यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरली आहे. पर्रीकर यांच्या पॅनलमध्ये मनोहर पर्रीकर यांच्या काळात भाजपचे नगरसेवक असलेले अनेक उमेदवार आहेत. त्यामुळे पणजीतील मतदार कोणाच्या पाठिशी उभे ठाकतात, ते पाहावे लागणार आहे.

Panaji Municipal Election 2026
Gokul News |'गोकुळ' निवडणूक लांबणीवर पडणार? मंगळवारच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

दोन नेत्यांचे भवितव्य ठरणार

महापालिका निवडणूक पणजीचे भवितव्य ठरवणारी आहे. महापालिकेत ज्याच्या पॅनलची सत्ता येईल त्याला भाजपची उमेदवारी २०२७ मध्ये मिळणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिल्यामुळे अपक्ष उमेदवारी भरुन उत्पल पर्रीकर यांनी मोन्सेरात यांना जोरदार टक्कर दिली होती. मोन्सेरात अवघ्या दीड हजार मतांनी निवडून आले होते. त्यामुळे जर महापालिका उत्पल पर्रीकर यांच्या आम्ही पणजीकर पॅनलने जिंकली, तर बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news