Goa Traffic Police | वाहतूक पोलिसांचा दणका! 2025 मध्ये 9 हजारांहून अधिक दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई

Goa Traffic Police | गेल्यावर्षी 9,207 हेल्मेटविना वाहनचालकांवर कारवाई
Goa Traffic Police
Goa Traffic Policepudhari photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात रस्ते सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई अधिक कडक केली असून, २०२५ मध्ये हेल्मेट न घालता वाहन चालवणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ६७ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

Goa Traffic Police
Smart Meter Goa | स्मार्ट मीटरवरून सुरू राजकारण, मुख्य अभियंता फर्नांडिस यांची जनसुनावणीत स्पष्ट भूमिका

वर्षभरात ९, २०७दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत हेल्मेटविना दुचाकी चालवणाऱ्या चालक व मागे बसलेल्या प्रवाशांवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Goa Traffic Police
Goa Illegal Construction | बेकायदा बांधकाम 31 मेपर्यंत पाडणार

अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती रोखण्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. २०२५ मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत २,८७१ प्रकरणे नोंदवण्यात आली, एप्रिल ते जूनमध्ये १,३९०, जुलै ते सप्टेंबरमध्ये २,४७३, तर ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये २,४७३ प्रकरणे नोंदली गेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news