Ashadhi Ekadashi 2026| पंढरपूरसाठी कदंबच्या विशेष गाड्या

Ashadhi Ekadashi 2026| आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी महामंडळाचा उपक्रम
Kadamba bus
Kadamba bus
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी कदंब वाहतूक महामंडळाने विशेष गाड्यांची सोय केली आहे. पंढरपूर येथे विठूमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. जणू भक्तीचाच मेळा भरत असतो.

Kadamba bus
Kolhapur News : पंचगंगा प्रदूषण मुद्द्यावरून शेती पाहणीत वादावादी; अंगावर धावून जाण्याचा प्रकार

टाळमृदुंगाच्या तालावर श्री विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन होऊन अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने जात असतात. गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक पंढरपूरला जात असतात. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कदंब वाहतूक महामंडळाने गोवा ते पंढरपूर या मार्गावर विशेष गाड्यांची सोय केली आहे.

२४ व २५ जुलै रोजी गोव्यातील विविध ठिकाणांवरून या बसगाड्या सुटणार आहेत. गोवा ते पंढरपूर तिकीट ५०० रुपये असणार आहे. रुपये आहे. अधिक माहितीसाठी कदंब वाहतूक महामंडळाच्या तिकीट विक्री केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kadamba bus
Saving Water | कोणता देश कसे वाचवतोय पाणी !

वेळापत्रक :

२४ जुलै सकाळी ८.४५ : मडगाव-पणजी म्हापसा पेडणे, सकाळी ११ : वास्को-पणजी-म्हापसा - पेडणे, दुपारी १२ : मडगाव - फोंडा - मौले - बेळगाव दिनांक

२५ जुलै सकाळी ६.३० : पणजी-म्हापसा - पेडणे - सावंतवाडी, पणजी - म्हापसा पेडणे सकाळी ८.४५ : मडगाव -, सकाळी ११: वास्को- पणजी-म्हापसा पेडणे, सकाळी ११: पणजी म्हापसा साखळी - बेळगाव, दुपारी १२: मडगाव - फौंडा-मौले- बेळगाव, दुपारी २.५० : पणजी - म्हापसा -पेडणे - सावंतवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news