Goa Water Metro Project | गोव्याचा प्रवास होणार अधिक हायटेक! पुढील दोन वर्षांत सुरू होणार स्वप्नवत 'वॉटर मेट्रो'

Goa Water Metro Project | राबवणार कोची पॅटर्न; सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प
Water Metro Project
Water Metro ProjectPudhari
Published on
Updated on

कोची (केरळम) : विजय जाधव

केंद्र आणि केरळम सरकारने कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्प यशस्वी केल्यानंतर देशभरातील १५ प्रमुख शहरांसाठी 'कोची वॉटर मेट्रो पॅटर्न' राबवला जाणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई तसेच गोव्यात हा प्रकल्प साकारणार आहे. मुंबई शहरासाठी सुमारे ६ हजार ६६ कोटींच्या व्यापक प्रकल्पाला गती देण्यात येणार असल्याचे कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या सूत्रांनी सोमवारी (दि. २१) सांगितले.

Water Metro Project
Illegal Fabrication Work | बेकायदेशीर फॅब्रिकेशन व्यावसायिकांना चाप लावा! गोवा फॅब्रिकेटर्स असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे धडक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्याशी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली असून प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन वर्षांत म्हणजे २०२८ पर्यंत हा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली आहेत.

केरळमधील कोची वॉटर मेट्रोला भेट देऊन तिची कार्यपद्धती आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली. केंद्रीय पत्र सूचना कार्यालयाने महाराष्ट्रातील निवडक पत्रकारांसाठी कोची वॉटर मेट्रो प्रकल्प पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी प्रस्तावित मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

Water Metro Project
Raigad Crime | १ कोटी ४९ लाखाचा गोवा बनावटीचा मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाने महाडजवळ पकडला!

कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले होते. केंद्र सरकारच्या पर्यायी वाहतूक मार्गांचा विकास करण्याच्या धोरणानुसार महाराष्ट्र सरकारने या प्रकल्प उभारणीचा संकल्प केला आहे.

मुंबई वॉटर मेट्रोसाठी सुमारे ६,०६६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज मांडण्यात आला आहे. या प्रकल्पात जलमार्ग, टर्मिनल, बोटी आणि संबंधित पायाभूत सुविधांचा विकास अपेक्षित आहे. मात्र, या प्रकल्पाची कार्यक्षमता सुरक्षित जलमार्ग, नियमित ड्रेजिंग, दिशादर्शक व्यवस्था आणि लोकल, मेट्रो तसेच बस वाहतुकीशी होणाऱ्या प्रभावी जोडणीवर अवलंबून राहणार आहे.

त्याची व्यवहार्यता तपासली जात आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रहिवाशांना २०२८ पर्यंत नरिमन पॉईंट, वर्सोवा आणि वांद्रेदरम्यान वॉटर मेट्रो सेवांचा लाभ घेता येईल, पहिल्या टप्प्यात या मार्गांवरील प्रकल्प पूर्ण करण्याच्या हालचाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news