ST Reservation Goa | 30 वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी! गोव्यात एसटी समाजाला राजकीय आरक्षण लागू

ST Reservation Goa | गोव्यातील अनुसूचित जमाती (एसटी) बांधवांसाठी राजकीय आरक्षण मिळावे यासाठी गेली ३० वर्षे जो लढा सुरू होता त्याला अखेर यश मिळाले आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील अनुसूचित जमाती (एसटी) बांधवांसाठी राजकीय आरक्षण मिळावे यासाठी गेली ३० वर्षे जो लढा सुरू होता त्याला अखेर यश मिळाले आहे. केंद्र सरकारने गुरुवारी राजपत्रामध्ये एसटी समाजासाठी आरक्षण देण्याची अधिसूचना जारी केली आहे. अवर सचिव अकाली घोंगे यांच्या सहीने ही अधिसूचना जारी झाली. एसटींना राजकीय आरक्षण देण्याचा राज्य विधानसभा प्रतिनिधित्व अधिनियम कायदा अंमलात आला.

CM Pramod Sawant
Tarun Tejpal Case | तरुण तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान! गोवा सरकारच्या अर्जावर उच्च न्यायालयाचा आज महत्त्वपूर्ण निकाल

केंद्र सरकारने 'गोवा राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाची पुनर्रचना अधिनियम, २०२५' अधिसूचित केला आहे. तो ६ ऑगस्ट २०२६ पासून अंमलात आणला आहे.

यासंबंधीची अधिसूचना 'गॅझेट ऑफ इंडिया'मध्ये प्रसिद्ध केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, आमदार गोविंद गावडे यांच्यासह अनेक एसटी नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

CM Pramod Sawant
Sindhudurg Accident : गोवा-माशेल येथे अपघात; डिंगेणतील तरुण ठार

४० पैकी किमान चार जागा जिथे एसटी मतदारांची संख्या जास्त आहे, असे चार मतदारसंघ एसटीसाठी राखीव होतील. यामध्ये प्रियोळ, सांगे, केपे व काणकोण यांचा अंतर्भाव असू शकतो किंवा केपेला वगळून नुवे हा मतदारसंघ एसटीसाठी राखीव होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे आभार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला असून, भाजपच्या सरकारने दिलेले वचन पाळले याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. हा सामाजिक न्याय चळवळीचा विजय आहे. राजकीय आरक्षण मिळावे यासाठी गेली अनेक वर्षे एसटी बांधवांनी संघर्ष केला आणि त्याचे फळ आज मिळालेले आहे, असे सावंत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news