Sindhudurg Accident : गोवा-माशेल येथे अपघात; डिंगेणतील तरुण ठार

डिंगणे गावासह परिसरात हळहळ
Sindhudurg News
गोवा-माशेल येथे अपघात; डिंगेणतील तरुण ठार
Published on
Updated on

बांदा : सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे येथील महादेव चंद्रकांत सावंत (४५) यांचा गोव्यातील माशेल येथे गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे डिंगणे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महादेव सावंत हे नेहमीप्रमाणे सकाळी ९.३० वा. दुचाकीवरून डिंगणे येथून गोव्यातील कामाच्या ठिकाणी जात होते. माशेल येथे समोरून भरधाव येणाऱ्या जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, सावंत रस्त्यावर फेकले गेले. डोक्यासह शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी जीपचालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. मडगाव (गोवा) येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर डिंगणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महादेव सावंत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व अन्य नातेवाईक असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news