Goa GI tag products- राज्यातील सहा उत्पादनांना मिळणार जीआय टॅग

नारळावरील कोरीवकाम, कुणबी साडी, कावी कला, धोदेल, गोवन चोरुझसह घुमटाचा सहभाग
Goa GI tag products
Goa GI tag products
Published on
Updated on

पणजी : राज्यातील नारळावरील कोरीवकाम, कुणबी साडी आणि कापड, कावी कला, धोंदेल, गोवन चोरिनो (सॉसेज) आणि घुमट यांना भौगोलिक संकेत (जीआय टंग) मान्यता मिळवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. ही उत्पादने तपासणीत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाली असून, चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणी कार्यालयाकडून नोंदणीसाठी स्वीकारण्यात आली आहेत. जीआय प्रमोशनसाठीचे राज्य नोडल अधिकारी दीपक परब यांनी मंगळवारी सांगितले की, राज्य सरकार लवकरच तपासणी अहवालावर आपले उत्तर सादर करेल. त्यानंतर जीआय टेंग अधिकृतपणे मंजूर होण्यापूर्वी वस्तू अनिवार्य १२० दिवसांच्या नोटीस कालावधीत दाखल होतील.

परब म्हणाले की, सॉसेज आणि घुमट या उत्पादनांनी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून नोंदणीसाठी त्यांची निवड झाली आहे. नारळावरील कोरीवकाम, कुणबी साडी आणि कापड, कावी कला, धोदेल, गोवन चोरुन (सोसेस) ही सहा उत्पादने जीआय टॅग मळवणार आहेत.

Goa GI tag products
Goa Birch by Romeo Lane case- 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणी 11.01 कोटींची मालमत्ता जप्त

दरम्यान, गोव्याच्या जीआय क्वेस्टमध्ये पाच वस्तूंचा समावेश झाला आहे. यात गोवन पाव, स्थानिक पोळी, डोसे, स्थानिक मीठ आणि पारंपरिक तांबे-पितळ धातूकाम यांचा यात समावेश आहे. यासाठी जानेवारीमध्ये स्थानिक सॉल्ट सबमिशन दाखल करण्यात आले. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये पोळी, डोसे आणि धातूकाम यांचा समावेश करण्यात आला, असे परब म्हणाले. या नवीन नोंदी जानेवारीतील विस्तारानंतर झाल्या आहेत.

Goa GI tag products
Goa Gauresh Gawas anticipatory bail | बर्च नाईट क्लबला बोगस दाखला दिल्याप्रकरणी अबकारी खात्याचा वरिष्ठ लिपिक गौरेश गावसला अटकपूर्व जामीन

गोव्याच्या सुरुवातीच्या जीआय टंग यादीमध्ये १० उत्पादने आहेत. यात गोवा काजू, हरमल मिरची, खोला मिरची, मंडोळी केळी, आगासी वांगी, सात शिरांचा मेडा, काजू फेणी, खाजे, मानकुरात आंबा आणि बेबिका यांचा समावेश आहे. भौगोलिक संकेताची मान्यता प्रादेशिक उत्पादनांची वैशिष्ट्वपूर्ण ओळख जपण्यास मदत करते, त्याचबरोबर स्थानिक उत्पादकांसाठी विक्री किंमत सुधारते, असेही परब म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news