Goa Shigmostav 2026 | गोव्यात आजपासून 'घुमचे कटर घुम'

Goa Shigmostav 2026 | शिमगोत्सवास प्रारंभ : चोरोत्सव, घोडेमोडणी, रंगपंचमी आकर्षण
Goa Shigmostav 2026
Goa Shigmostav 2026
Published on
Updated on

पणजी : विठ्ठल गावडे-पारवाडकर

ढोल-ताशांचा 'घुमचे कटर घुम'चा निनाद आणि त्याच्या जोडीला 'शवय... शबय'चे बोल आता राज्याच्या कानाकोपऱ्यात घुमणार आहेत. सत्तरी तालुक्यातील शिमगोत्सवाने राज्यातील शिमगोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला असून, ठिकठिकाणी होळी उभारण्यात आल्या आहेत. मंगळवारी सकाळी बहुतांश गावांतील मंदिरांसमोर होळी उभारल्यानंतर खऱ्या अर्थाने शिमग्याला सुरुवात होणार आहे.

Goa Shigmostav 2026
Jalgaon Sand Mining | जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांना दणका! 678 वाहनांवर कारवाई, 10 कोटींहून अधिक दंड वसूल

त्यानंतर पहिलाच पारंपरिक उत्सव होतो तो चोरोत्सव, त्यानंतर रोंबाट, घोडेमोडणी, रणमाले, तालगडी, मोरुलो सादरीकरण, करवली, कळस मिरवणूक, पालखी मिरवणूक व न्हावाण, असे अनेक उत्सव सत्तरीतील गावांमध्ये साजरे केले जातात. होळी उभारण्यापूर्वी ती आंब्याच्या पानांनी सजवली जाते.

काही गावांत ही होळी पोफळीच्या झाडाची तर ग्रामीण भागात उंच झाडाची असते. ती गावात आणताना ढोल-ताशांच्या गजरात फिरवली जाते. त्यानंतर तिला आंब्याची पाने बांधून व शेंड्यावर भगवा ध्वज बांधून उभी केली जाते. होळी उभारल्यानंतर काही गावांत तिला बांधलेल्या दोरीवरून चढून होळीला बांधलेले नारळ काढण्यासाठी झटापटी होतात, तर काही गावांत तिच्या मुळाशी नारळ फोडले जातात. त्यानंतर चोरत्सव होतो.

चोर बनलेले स्थानिक मुले अंगाला झाडांची पाने बांधून गावात फिरतात. त्यावेळी परिसरात असलेली फळे वगैरे ते काढून नेतात. मात्र, लोक त्यांना काही बोलत नाहीत. सत्तरीतील झरमे गावात होळी दिवशी व करंझाळे गावात होळीच्या ९ व्या दिवशी चोरोत्सव हा वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.

ठाणे व होंडा येथील घोडेमोडणी प्रसिद्ध आहे. घोड्याच्या तोंडाच्या आकाराचे सजवलेले कपडे घालून स्थानिक लोक ढोल-ताशांच्या तालावर नाचतात. त्यावेळी काही जागी शवय... शबयचा गजर केला जातो. ठाणेत एकापेक्षा अनेक व्यक्ती घोडे नेसतात, तर काही गावात लाल व पांढरा असे दोनच रंगाचे घोडे नेसले जातात.

बहुतांश गावांत चौथ्या दिवशी घोडेमोडणी होते. ही घोडेमोडणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते. कोपार्डे येथील देव कळस मिरवणूक ही परंपरागत होते. या दिवशी गावात कळसाची मिरवणूक घरोघरी काढली जाते. रोंबाट हा सत्तरी तालुक्यातील शिमगोत्सवाचे एक महत्त्वाचे अंग आहे.

जोरजोराने ढोल-ताशा वाजवत तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन बेधुंद होऊन नाचत ठराविक स्थानापासून मंदिरापर्यंत येतात. गावागावांतील रंगपंचमी वेगवेगळ्या दिवशी खेळली जाते. त्यानंतर राधा नृत्य, ज्यात पुरुष स्त्री वेश करून घराघरासमोर नाचतात. त्यावेळी पारंपरिक जती (गाणी) म्हटली जातात. कारे परंपरागत हा चोरोत्सव लोकांच्या आकर्षणाचा उत्सव ठरला आहे.

Goa Shigmostav 2026
Jalgaon Crime News | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणाऱ्या 'पप्पू'च्या मुसक्या आवळल्या; 4 लाखांची कार जप्त

केरी-सत्तरीतील सती हा परंपरागत उत्सव साजरा होतो. काही गावांत इतर अनेक परंपरा जपल्या जातात. बहुतांश गावी पाच दिवसांचा शिमगा होतो, या दिवसांत तालगडी, फुगडी, रणमाले, सोंग आदी विविध लोकनृत्ये सादर केली जातात. पाचव्या दिवशी न्हावण झाल्यानंतर शिगम्याची सांगता होते.

आकर्षक सुमधुर सोकारती... : शिमग्यातील करवली हा प्रकार फारच आकर्षक असतो. दोन लहान मुलांना हिरव्या साड्या नेसवून त्यांची घरोघरी पूजा होते. यावेळी स्थानिक नागरिक ज्या सोकारती तथा परंपरागत गाणी म्हणतात. या गाण्यांतून पौराणिक कथा सादर करतात. या सोकारती पूर्वी फक्त पुरुष सादर करत होते. मात्र, आता सत्तरीत महिलाही सोकारती सादर करतात.

आगळेवगळे चोरोत्सव...

सत्तरीतील झरमे गावात होळी दिवशी व करंझाळे गावात होळीच्या ९ व्या दिवशी चोरोत्सव वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. तो पाहण्यासाठी गोमंतकीयांसह पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. या चोरोत्सवात स्थानिक गावकऱ्यांपैकी काहीजण स्वतःला जमिनीत गाडून घेतात. अनेकांची डोक्याखालील शरीरे मातीमध्ये गाडली जातात, तर काहींची डोकीही मातीत गाडली जातात व शरीर बाहेर ठेवले जाते. अशा प्र

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news