Goa Crime News | साखळीत खळबळ! घरात घुसून 55 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; सावंतवाडीचा संशयित फरार

Goa Crime News | संशयित सोनसाखळी; मोबाईल घेऊन फरार
Woman killed while going for morning walk in Juna Hingna
जुना हिंगणा येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेची हत्याFile Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

साखळी येथील चिकणे-कुडणे येथे ५५ वर्षीय शैला संजय घाडी या महिलेला सागर राऊळ (रा. सावंतवाडी) या तरुणाने बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

Woman killed while going for morning walk in Juna Hingna
Goa Teacher Recruitment 2026 | 390 शिक्षक पदांसाठी 2 हजार अर्ज

ही घटना मंगळवारी घडली असून संशयित घटनास्थळावरून तिची सोनसाखळी व मोबाईल घेऊन फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सागर राऊळ याचे घाडी कुटुंबियाकडे येणे-जाण होते.

मयत शैला घाडी हिला दोन मुली व एक मुलगा अशी मुले आहेत. यापैकी एका मुलीशी संशयिताची मैत्री होती. काही दिवसांपूर्वी संशयिताचा घाडी कुटुंबियाशी वाद झाला होता व याप्रकरणी डिचोली पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामुळे संशयिताला त्याचा राग होता.

Woman killed while going for morning walk in Juna Hingna
Revolutionary Goan Party: भूमिपूत्रांचा पक्ष असलेल्या 'रिव्होल्यूशनरी गोवन्स'चा दोन नेत्यांमधील वादामुळे 'फुटबॉल' का झालाय?

मंगळवारी सकाळी शैला घाडी हिची मुले सकाळी कामाला निघून गेल्यावर संशयित सागर हा दुपारच्या सुमारास आला. त्याने तिच्याशी भांडण सुरू केले. या भांडणाचे रुपांत मारहाणीत झाले. संशयिताने शैला घाडी हिचे डोके व चेहरा भिंतीवर वारंवार आपटल्याने तिच्या चेहऱ्याला व डोक्याला जबर जखमा झाल्या.

या झटापटीत त्याने तिची सोनसाखळी व मोबाईल घेऊन पसार झाला. त्याने याच मोबाईलवरून एका मुलीला फोन करून आईला मारहाण केल्याची माहिती दिली. मुलीने फोन केल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तो सावंतवाडीचा रहिवाशी असल्याने तेथेही शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news