Goa Sal River |साळ नदीला पुन्हा प्रदूषणाचा विळखा

२८ ठिकाणी थेट सांडपाणी तर ३२ ठिकाणी कचऱ्याचे मोठे साठे, नागरिकांत संताप
Goa Sal River
Goa Sal River
Published on
Updated on

मडगाव : साळ नदीत २८ ठिकाणी थेट सांडपाणी सोडले जात असून ३२ ठिकाणी घनकचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत, तर ३८ ठिकाणी कचऱ्याचे मोठे साठे आढळून आल्याने सासष्टीची जीवनवाहिनी असलेल्या साळ नदीच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 'आमचे साळ' या ड्रोन सर्वेक्षणातून हे धक्कादायक बास्तव समोर आले आहे.

Goa Sal River
Goa water crisis| धरण उशाला अन् कोरड घशाला

बाणावलीचे आमदार बेन्झी व्हिएगस यांच्या पुढाकाराने नुकत्याच केलेल्या या ड्रोन सर्वेक्षणात सुमारे ४ किलोमीटरच्या नदी परिसराचा सखोल अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणातून नदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले असून विविध ठिकाणी बिनधास्तपणे सांडपाणी आणि कचरा सोडला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

अहवालानुसार, २८ ठिकाणी सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. याशिवाय ११ सांडपाणी नाले कोणतीही प्रक्रिया न करता नदीत मिसळत असल्याचेही उघड झाले आहे. घनकचऱ्याच्या बाबतीत परिस्थिती अधिक गंभीर असून ३२ ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत, तर ३८ ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साठे निर्माण झाले आहेत. सुमारे २३५ मीटरपर्यंत नदीकाठ तुटलेला व अस्थिर झाल्याचे आढळून आले आहे

कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात

आमदार व्हिएगस यांनी या अहवालाच्या आधारे संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. गोबा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर संबंधित विभागांनी दोषींवर कठोर कारवाई करून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, कवरा व्यवस्थापन सुधारणे आणि नदीकाठी संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

Goa Sal River
Goa Tourism | विदेशात जाणाऱ्या देशी पर्यकटांची पावले गोव्याकडे

पुरावेच समोर

दरम्यान, या ड्रोन सर्वेक्षणामुळे प्रत्यक्ष पुराव्यांसह समोर आलेल्या या धक्कादायक बाबी प्रशासनावर आता ठोस कारवाईचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news