Sal Gade Utsav Bicholim Goa | गडे उत्सवात राजकीय नेत्यांची हजेरी

Sal Gade Utsav Bicholim Goa | डिचोली तालुक्यातील साळ येथील प्रसिद्ध गडे उत्सवाच्या रात्री भाविकांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही उपस्थिती लावली.
Sal Gade Utsav Bicholim Goa
Sal Gade Utsav Bicholim Goa
Published on
Updated on

साळ : पुढारी वृत्तसेवा

डिचोली तालुक्यातील साळ येथील प्रसिद्ध गडे उत्सवाच्या रात्री भाविकांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही उपस्थिती लावली. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर, डिचोली मतदारसंघाचे माजी आमदार नरेश सावळ,

Sal Gade Utsav Bicholim Goa
Goa AI Traffic Cameras | गोव्याच्या रस्त्यांवर आता 'एआय'ची नजर! वाहतूक शिस्तीसाठी राज्यभरात 100 स्मार्ट कॅमेरे बसवणार

माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, तसेच साबाजी शेट्ये, रवळू शेट्ये आणि दिलीप धारगळकर यांनी होळी व देवतांचे दर्शन घेतले. तीन रात्री चालणाऱ्या या उत्सवाच्या तिसऱ्या रात्री, गुरुवारी खासदार सदानंद शेट तानावडे आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी उत्सवस्थळी भेट दिली.

Sal Gade Utsav Bicholim Goa
Goa Road Maintenance | फॉर्म्युला 4 सर्किट रेससाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करा

श्री महादेव भूमिका देवस्थानचे माजी अध्यक्ष कालिदास राऊत, माजी सचिव विशाल परव, तसेच लाडू परब, सगुण राऊत, मुकुंद परब, शांबा घुरे आणि महाजन तसेच ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या समवेत माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्येही उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news