Goa robbers purchased weapons Margao investigation- दरोडेखोरांनी हत्यारे मडगाव येथून खरेदी केल्याचे उघड

दरोडेखोरांनी हत्यारे मडगाव येथून खरेदी केल्याचे उघड
crime
crime
Published on
Updated on

पणजी: दोनापावला व म्हापसा दरोडा प्रकरणी गोवा क्राईम ब्रँचने अटक केलेल्या दरोडेखोरांनी मडगाव येथील एका दुकानातून हत्यारे खरेदी केल्याचे उघड झाले असून त्याचा पुरावाही जप्त केला आहे. धाक दाखवण्यासाठीची गावठी पिस्तुले त्यानी गोव्यात येतानाच घेऊन आल्याची माहिती दरोडेखोरांनी पोलिसांना दिली आहे. पाचपैकी दोघे दरोडेखोर पोलिस तपासात सहकार्य करत असल्याने तपासवेगात सुरू आहे. या दरोड्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या नदीम खान हा सराईत गुन्हेगार असून त्याने बांगलादेशातून काही कामाचे आमिष दाखवून गोव्यात आणले होते.

crime
Goa-कार ठोकरून पळ काढणाऱ्या चालकास आमदार संकल्प आमोणकरांनी पकडले

झटपट पैसा मिळवण्याचे त्यांना गोव्यात आल्यावर आमिष दाखवले व दरोड्याची योजना आखली. नदीम याचा गुन्हेगारी रेकॉर्ड गोवा पोलिसांकडे होता त्यामुळे या प्रकरणाचा छडा मदत मिळाली. भारतात प्रवेश करण्याच्या वाटा असलेल्या राज्याच्या पोलिसांकडे नदीम खान याच्यासह त्याच्या सहकारांचा संशय असलेल्यांची माहिती देण्यात आली होती.

crime
Tiger death mystery - वाघाच्या मृत्यूचे गूढ कायम; फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोनापावल येथील दरोड्यातून ३५ लाखांचा ऐवज तर म्हापसा येथील दरोड्यातून २० लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. चोरलेल्या रोख रक्कम तसेच सोन्यांच्या दागिन्यांची काही प्रमाणात पाचपैकी दोघे दरोडेखोरांनी दिली आहे. चोरलेला माल घेऊन दरोडेखोर वेगवेगळ्या मार्गाने गोव्यातून १२ तासांच्या आत पसार झाले तर भारतातून ४६ तासात मेघालयमार्गे गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news