Goa-कार ठोकरून पळ काढणाऱ्या चालकास आमदार संकल्प आमोणकरांनी पकडले

वास्कोतील घटनेत जखमी महिलेचा मृत्यू
Goa
Goa
Published on
Updated on

वास्को:येथील विमानतळासमोरच्या दाबोळी रस्त्याकडेला शनिवारी (दि. २) रात्री उभ्या असलेल्या एका ६० वर्षीय महिलेला कारची जोरदार धडक देऊन कारसह पळ काढणाऱ्या चालकाचा वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सुमारे बारा किलोमीटर पाठलाग करून पकडले. या अपघातात मांगोरहिल येथे राहणारी सिद्धम्मा मदार (६०) यांचा मृत्यू झाला. तर कारचालकाचे नाव सचिन शैलेंद्र चोप्रा (३०) असे असून, तो मूळचा उज्जैन-मध्यप्रदेशचा आहे.

Goa
Goa crime | पूर्ववैमनस्यातून पुतण्यांनीच मानेवर कुन्हाड घालून केली चुलत काकाची हत्या

वरुणपुरी येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे तो आला होता. आपल्या नातेवाईकाची कार घेऊन तो बाहेर पडला होता. अपघातानंतर माणुसकी दाखविण्याऐवजी त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. आमदार आमोणकर यांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला. शनिवारी (दि. २) रात्री ९.३० च्या आसपास सचिन चोप्रा हा अतिवेगाने वेर्णाहून दाबोळीकडे येत होता, त्यावेळी महिलेला धडक बसली.

Goa
Goa | 'रिव्होल्युशनरी गोवन्स' फुटीच्या उंबरठ्यावर?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news