Goa heatwave 2026 |एप्रिल महिना सर्वाधिक तापमानाचा

मे महिन्याच्या सुरुवातीला कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता
Goa heatwave 2026
Goa heatwave 2026
Published on
Updated on

पणजी : भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहिती-नुसार, गोव्यात एप्रिल २०२६ चा शेवट उष्णतेच्या लाटेत झाला, ज्यात दिवसा आणि रात्रीचे तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त राहिले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, २९ एप्रिल रोजी ३५.४ अंश सेल्सिअस या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली, ते ३३.८ अंश सेल्सिअस या सामान्य तापमानापेक्षा सुमारे १.६ अंश सेल्सिअसने जास्त होते. पणजीमध्ये ११ एप्रिल आणि पुन्हा २९ एप्रिल रोजी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, ते सरासरीपेक्षा २.१ अंश सेल्सिअसने जास्त होते.

Goa heatwave 2026
Goa Robbery |टेहळणी, निरीक्षण करून घालायचे दरोडे

एप्रिल, २०२१ रोजीही अशाच उच्च तापमानाची नोंद झाली होती. २२ आणि ३० एप्रिल रोजी किमान तापमान २८.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले, जे सरासरीपेक्षा सुमारे २.२ अंश सेल्सिअसने जास्त होते आणि गेल्या अनेक दशकांतील एप्रिल महिन्यातील हे सर्वाधिक किमान तापमान नोंदवले गेले. याच कालावधीतील सर्वात कमी किमान तापमान २३ एप्रिल रोजी २६.५ अंश सेल्सिअस होते, तेदेखील सरासरीपेक्षा जास्त होते.

Goa heatwave 2026
Labor Day | कामगारदिनी ५ कल्याणकारी योजनांची भेट : मुख्यमंत्री

'आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रात्रीच्या तापमानात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे दिवसा उष्णतेतून सावरण्याची शरीराची क्षमता कमी होते. दक्षिण गोव्याच्या काही भागांमध्ये २३ ते २९ एप्रिलदरम्यान मान्सूनपूर्व पावसाचा पुन्हा अनुभव आला, जिथे सरासरी ०.८ मि.मीच्या. तुलनेत २.७ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर उत्तर गोवा कोरडा राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news