Goa Robbery |टेहळणी, निरीक्षण करून घालायचे दरोडे

मेघालयमार्गे प्रवेश; नदीम खान मुख्य सूत्रधार; ५ दरोडेखोरांना पोलिस कोठडी
Goa Robbery
पणजी : दरोडाप्रकरणी तपास केलेल्या पोलिस निरीक्षक व कॉन्स्टेबलसमवेत पोलिस महासंचालक अलोक कुमार, अधीक्षक राहुल गुप्ता, अधीक्षक जीवबा दळवी.
Published on
Updated on

पणजी : दोनापावला व म्हापसा येथे दरोडा घालण्यापूर्वी दरोडेखोरांची टोळी दिवसा रात्री टेहळणी करायची, लोकांच्या हालचालींचे निरीक्षण करायचे व लक्ष्य निश्चित झाल्यावर दरोडा घालून मेघालयमार्गे भारतातून बांगला देशात पसार व्हायची. या दोन्ही दरोड्यांमध्ये मुख्य सूत्रधार नूर इस्लाम ऊर्फ नदीम खान आहे. दोन वर्षांपूर्वी कोलवाळ कारागृहात असताना संशयित नूर इस्लाम याने गोव्यात दरोड्याचा कट रचला होता. गोव्यात आणलेल्या पाचही दरोडेखोरांना न्यायालयाने ११ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली.

पणजीतील पोलिस मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला क्राईम ब्रचचे अधीक्षक राहुल गुप्ता यांच्यासह अधीक्षक जीवबा दळवी, निरीक्षक तुषार लोटलीकर, निरीक्षक निखिल पालेकर, निरीक्षक दिनेश गडेकर, निरीक्षक किशोर रामानन उपस्थित होते. दोनापावला व म्हापसा दरोड्याचा तपास उत्तर गोवा पोलिस व क्राईम बैंचने संयुक्तपणे केला. दोनापावला दरोड्यात दरोडेखोर बांगला देशी असल्याचे निष्पन्न झाले होते.

Goa Robbery
Goa news | विधिमंडळामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्याची गरज

म्हापसा दरोडाप्रकरणी गोवा पोलिसांनी दरोडेखोरांचा हैदराबादपर्यंत पाठलाग केला. मात्र, काही तासांपूर्वीच ते मेघालयमार्गे भारतातून बांगला देशात पसार झाले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी गोवा पोलिसांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा, मेघालय, दिल्ली आदी राज्यांमध्ये पथके तैनात केली होती. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफल) आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्याशी समन्वय साधून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.

त्यानंतर त्यांची परतण्याची वाट अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने गोवा पोलिस पाहत होते. १३ एप्रिलच्या मध्यरात्री ते दिल्लीत आल्याची खबर मिळताच दिल्ली क्राईम ब्रेच पोलिसांना सतर्क करण्यात आले व सहा दरोडेखोरांना अटक झाल्याची माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली.

Goa Robbery
Labor Day | कामगारदिनी ५ कल्याणकारी योजनांची भेट : मुख्यमंत्री

कोलवाळ कारागृहात मैत्री

दरोडेखोर नूर इस्लाम ऊर्फ नदीम खान हा एका गुन्ह्यात कोलवाळ कारागृहात होता. तेथे त्याची ओळख होऊन महम्मद याकुब (उत्तर प्रदेश) याच्याशी २०२४-२५ या काळात मैत्री झाली होती. त्याने दोनापावला येथील दरोड्यासाठी ४ हजार रुपये नदीम खान याला दिले होते. म्हापसा दरोडा प्रकरणात दरोडेखोर सैफुल इस्लाम याला राजू बाबू व सैफुल आमीर याने दरोड्यापूर्वी राहण्याची सोय केली होती. त्यामुळे यापूर्वीच याकूब, राजू व सैफुल या तिघांना अटक करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news