CM Pramod Sawant |"नीती आयोगाचा गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 जाहीर! मोठ्या राज्यांमध्ये गोवा चौथ्या तर लहान राज्यांत पहिल्या स्थानावर"

CM Pramod Sawant | नीती आयोगाचा अहवाल : लहान-राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिले स्थान
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक २०२६ मध्ये गोव्याने भारतात मोठ्या राज्यांमध्ये चौथे आणि लहान-राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात गुंतवणूकदारांसाठी अनुकूलतेच्या निर्देशांकात गोवा राज्य ५३.१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

CM Pramod Sawant
Maharashtra Public Service Commission | सुधारणांची परीक्षा

पहिल्या क्रमांकावर गुजरात (५६.६ गुण), महाराष्ट्र (५३.७ गुण) आणि तामिळनाडू (५३.३ गुण) आहेत. ५२.४ गुणांसह ओडिशा पाचव्या क्रमांकावर आहे. नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक २०२६ मध्ये गोव्याने ५३.१ च्या एकूण गुणांसह ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चौथे स्थान मिळवले आहे.

तसेच, सात शहर-राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही ते पहिल्या क्रमांकावर आहे. ५० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या केवळ पाच राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे. हा निर्देशांक पायाभूत सुविधा, व्यावसायिक वातावरण, संसाधने, आदी स्तंभांच्या आधारे गुंतवणूक परिसंस्थेची ताकद आणि सज्जतेचे मूल्यांकन करतो.

गोव्याने नियामक सुलभतेमध्ये ७१ टक्के गुणांसह सर्वाधिक गुण नोंदवले. संस्थात्मक वातावरणात ६६ टक्के, आर्थिक आरोग्यामध्ये ६१ टक्के आणि पायाभूत सुविधा व संसाधनांमध्ये प्रत्येकी ५६ टक्के गुण मिळवले.

राज्याने व्यावसायिक वातावरणात ४२ टक्के आणि सरकारी धोरणात २६ टक्के गुणांसह राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. एकूणच, मूल्यांकन केलेल्या आठपैकी सात क्षेत्रांमध्ये गोव्याने स्तंभाच्या सरासरीपेक्षा जास्त गुण मिळवले.

गोव्याने आपल्या श्रेणीमध्ये कौशल्य विकास आणि आरोग्यसेवेवर जीएसडीपीच्या टक्केवारीनुसार सर्वाधिक खर्च नोंदवला; उच्च शिक्षणातील जवळपास २५ टक्के प्रवेश अभ्यासक्रमांमध्ये आहेत, तर प्रवेशाचा वाटा आणि व्यावसायिक-प्रशिक्षण क्षमता या दोन्हीमध्ये राज्याने आपल्या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली, गोव्याने अधिक मजबूत पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ, नियामक कार्यक्षमता, कनेक्टिव्हिटी आणि स्वच्छ ऊर्जा यांवर लक्ष केंद्रित करणारा विकास दृष्टिकोन अवलंबला आहे.

CM Pramod Sawant
Opposition to AI cameras | एआय कॅमेऱ्यांनाही विरोध

तरुणांना अधिक संधीसाठी प्रयत्नशील : डॉ. सावंत

नीती आयोगाची ही मान्यता, एक पारदर्शक, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज गुंतवणूक परिसंस्था उभारण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या समन्वित प्रयत्नांचे द्योतक आहे.

जबाबदार गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, दर्जेदार रोजगार निर्माण करण्यासाठी आणि गोव्याच्या तरुणांसाठी अधिक संधी निर्माण करण्यासाठी गोवा या यशावर पुढेही काम करत राहील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news