

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सायबर फसवणूक प्रकरणांमध्ये रक्कम गोठवण्याच्या बाबतीत गोवा राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गृह मंत्रालयाच्या सीएफसीएफआरएमएस प्रणालीद्वारे फसवणुकीची रक्कम गोठवण्यात गोवा पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. १९३० या सायबर हेल्पलाईन किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर सायबर फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच, संबंधित व्यवहारांचा मागोवा घेऊन गोवा सायबर कक्षाचे कर्मचारी विविध बँका व आर्थिक संस्थांच्या नोडल अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधतात.
या समन्वित प्रयत्नांमुळे फेब्रुवारी २०२६ महिन्यात एकूण फसवणूक रकमेपैकी तब्बल ४३ टक्के रक्कम गोठवण्यात यश आले आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी आज रायबंदर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक पोलिस अधीक्षक श्रीदेवी बी. व्ही., पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर व निरीक्षक अनुष्का वै बीर उपस्थित होते.
चालू वर्षांत आतापर्यंत एकूण २९ टक्के रकम गोठवण्यात आली असून गोठवलेली एकूण रक्कम ३.६१ कोटींवर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या जानेवारी फेब्रुवारी कालावधीच्या तुलनेत यावर्षी सायबर फसवणुकीच्या तक्रारींमध्ये ३० टक्क्यांनी घट झाली आहे. नागरिकांमध्ये वाढती जागरूकता आणि फसवणूक झाल्यानंतर तातडीने १९३० वर संपर्क साधण्याची सवय यामुळे हे शक्य झाले आहे, असे गुप्ता म्हणाले.
गोव्यातील क्लाऊड - आधारित १९३० हेल्पलाईन केंद्र ही यशाची मोठी कारणीभूत ठरली आहे. या बीती योग टॅबलेट्स पोट साफ न होणे, बद्धकोष्ठ, गॅसेस, ऑसडिटी, मूळव्याध इ. विकारांवर प्रभावी ! आजच रात्री घ्या, सकाळी OKI डॉ. अभिजीत 9422011723 केंद्रात येणाऱ्या सर्व कॉल्सना समर्पित कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद दिला जातो.
क्लाऊड टेलिफोनी प्रणालीमुळे १०० टक्के कार्यरत सेवा आणि वाढत्या कॉल संख्येला तोंड देण्याची क्षमता उपलब्ध झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व कॉल्सचे निरीक्षण केले जात असल्याने गुणवत्तापूर्ण व सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद दिला जातो. गोवा पोलिसांनी अलीकडेच 'झिरो एफआयआर' प्रणाली सुरू केली आहे.
या प्रणालीअंतर्गत १ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सायबर फसवणूक तक्रारी थेट एफआयआर म्हणून पोलिस स्थानकात नोंदवण्यात येत आहेत. ५ लाखांपेक्षा अधिक रक्कमेच्या तक्रारी सायबर क्राईम कक्षाकडे नोंद केल्या जाते आहे. संबंधित नागरिकांनी फसवलेली रकम परत मिळवण्यासाठी न्यायालयात तातडीने अर्ज करावा, असे आवाहन अधीक्षक राहुल गुप्ता यांनी केले. तपास अधिकाऱ्यांना पीडितांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलिसांचे आवाहन
गोवा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही संशयास्पद लिंक, एपीके फाईल, डीजीटल अरेस्टच्या धमक्या किंवा अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या धमकीच्या कॉल्सना बळी पडू नये आणि तत्काळ १९३० वर सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा.