Mandovi Casino Protest | मांडवी नदीत 'भव्य' कॅसिनोला विरोध! पणजीकरांनी गाठले मुख्यमंत्र्यांचे दालन; परवाना रद्द करण्याची मागणी

Mandovi Casino Protest | पणजीच्या नागरिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Casinos
Casinos
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजीतील मांडवी नदी मध्ये नांगरेलेले कॅसिनोसाठीचे ११२ मीटर लांब २ हजार व्यक्तींची क्षमता असलेले नवे भव्य जहाजाला दिलेला परवाना त्वरित मागे घ्यावा व मांडवीतील सर्व कॅसिनो हटवावेत, अशी मागणी पणजीच्या नागरिकांनी आज बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली.

Casinos
Goa Environmental Protection | गोवा नगर नियोजन कायद्यातील हीच आहेत ती वादग्रस्त कलमे

या भेटीमध्ये कॅसिनो बोटीवर गेमींग आयुक्त न नेमल्यामुळे सुमारे २ हजार कोर्टीचा वार्षिक महसूल बुडत असल्याचा दावा नागरिकांनी केला. गोवा बचावच्या निमंत्रक डॉ. सबिना मार्टिन्स यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्याच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात माजी नगरसेवक पॅट्रसिया पिंटो, आम आदमी पक्षाचे गोवा राज्य अध्यक्ष वाल्मिकी नाईक व इतर नागरिकांचा समावेश होता. डॉ. मार्टिन्स यांनी सांगितले की, नव्या भव्य जहाजाला आक्षेप घेऊन त्याला दिलेला परवाना त्वरित मागे घेण्याची व मांडवीतील कॅसिनो हटवण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. कॅसिनोमुळे गोव्यातील घराघरांत भांडणे होत आहेत. अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. पणजीच्या नागरिकांना कॅसिनोचा फार त्रास होत आहे. त्यामुळे ते हटवावेत अशी मागणी केल्याचे सांगून न्यायमूर्ती फेर्दीन रिबेलो यांनी आमच्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Casinos
Environmental protection : चला करू या संकलन बियांचे…

कॅसिनो विरोधात २५०० सह्या

कॅसिनो विरोधात सह्यांची मोहीम आम्ही सुरू केली असून आतापर्यंत २५०० लोकांनी त्यावर सह्या केल्या आहेत. आणखी सह्या घेऊन सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्याना दिले जाईल, असे डॉ. मार्टिन्स यांनी सांगितले. एका सर्वेक्षणात गोव्यात ५० हजार महिला सेक्स वर्कर म्हणून काम करत असल्याचे म्हटले आहे. हा कॅसिनोचा परिणाम असावा, असेही त्या म्हणाल्या.

गेमिंग आयुक्त नेमावा

सध्याच्या मांडवीतील कॅसिनोंद्वारे वर्षाला २ ते ३ हजार कोटी महसूल सरकारला मिळणे अपेक्षित आहे. मात्र गेमिंग आयुक्त न नेमल्यामुळे फक्त ७०० कोटी रुपये वर्षाकाठी मिळतात. त्यामुळे गेमिंग आयुक्त नेमावा, अशी मागणी वाल्मिकी नाईक यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news