Goa fake GST scam-दहा कोटींच्या बनावट जीएसटी सल्लागार प्रकरणाचा गोवा पोलिसांकडून पर्दाफाश

फरारी संशयिताला बेळगावातून अटक : चार दिवसांची कोठडी
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

पणजी : गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओसी) कथित बनावट जीएसटी आणि टॅक्स कन्सल्टन्सी प्रकरणाचा तपास करताना फरारी असलेल्या नकीब मुल्ला याच्या कर्नाटकातील बेळगाव येथून मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणात सुमारे १०.०६ कोटी रुपयांच्या चुकीच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) दाव्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

Fraud Case
Goa Mhadei dispute-म्हादईबाबत कोणतीही तडजोड नाही

संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित नकीब मुल्ला याच्याविरोधात २१ जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित गोव्यातून फरार झाला होता.

Fraud Case
Majhe Ghar deadline extension | साडेचार वर्षांत अटल आसरा योजनेचा 5,075 जणांना लाभ

त्याचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक रजाक शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयिताचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला बेळगाव येथे अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news