

केरी : पुढारी वृत्तसेवा
इंडियन रोप स्किपिंग फेडरेशनशी संलग्न असलेल्या अमॅच्युअर रोप स्किपिंग असोसिएशन, महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धा अलिबाग (मुंबई) येथे उत्साहात झाली. या स्पर्धेत १६ राज्यांमधील ४०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
गोव्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत १० सुवर्ण, ७ रौप्य व ७कांस्य अशी २४ पदके पटकावली. १२ वर्षांखालील मुलींचा गट डबल अंडर्स प्रकारात श्रावणी रामभाऊ कुंभार प्रथम, एन्ड्युरन्स प्रकारात ईशान्या हरमलकर द्वितीय, तर विद्या दशरथ घाडी तृतीय आली. स्पीड डबल अंडर्स रिले प्रकारात स्वरा परब, ईशान्या हरमलकर, श्रावणी कुंभार व युविका मळीक यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. १४ वर्षांखालील मुलांचा गट एन्ड्युरन्स प्रकारात लवेश नाईक प्रथम, रौनक घाडी, तृतीय इंडिव्हिज्युअल फ्रीस्टाइल प्रकारात शौनक संदेश बाराजणकर तृतीय, स्पीड डबल अंडर रिले प्रकारात शौनक संदेश बाराजणकर, लवेश धर्मेंद्र नाईक, शुभम चौहान व रियान नबी शेख यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर क्रिश नाईक, अथर्व गावकर, गितांशू विलास राणे व दीर्घायु संतोष नाईक यांचा संघ तृतीय क्रमांकावर राहिला. १४ वर्षांखालील मुलींचा गट स्पीड स्प्रिंट प्रकारात पूर्वी कामत प्रथम, डबल अंडर्स प्रकारात श्रीशा पाटील तृतीय, एन्ड्युरन्स प्रकारात पूर्वी कामत हिने प्रथम तर स्पीड डबल अंडर रिले प्रकारात तेजस्वी साखळकर, आध्या परव, श्रीशा पाटील व कीर्ती दीपक लमाणी यांच्या संघाला द्वितीय स्थान प्राप्त झाले.
१७ वर्षांखालील मुलींचा गट स्पीड डबल अंडर रिले प्रकारात तनस्वी घाडी, सोनिया गावकर, श्रावणी मराठे व पूजा पुजारी यांच्या संघाला तृतीय तर डबल डच स्पीड प्रकारात सोनिया गावकर, श्रावणी मराठे व पूजा पुजारी यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
१७ वर्षांवरील मुलांचा गट स्पीड स्प्रिंट प्रकारात दाऊद मुल्ला द्वितीय, डबल अंडर्स प्रकारात गंगाराम सावंत द्वितीय, तर एन्ड्युरन्स प्रकारात यश केरकर तृतीय, डबल डच स्पीड प्रकारात गंगाराम सावंत, धीरज नाईक व महेश होसमनी यांच्या संघाने द्वितीय, तर दाऊद मुल्ला, धीरज नाईक व महेश होसमनी यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
१७ वर्षांवरील मुलींचा गट स्पीड स्प्रिंट प्रकारात गौरी शेटगावकर हिने प्रथम, डबल अंडर्स प्रकारात नीरजा सांगोडकर प्रथम, तर एन्ड्युरन्स प्रकारात साधना अश्वेकर द्वितीय आली. डबल डच स्पीड प्रकारात नीरजा सांगोडकर, साधना अश्वेकर व गौरी शेटगावकर यांच्या संघाने प्रथम, प्रशिक्षक म्हणून कोच अंजुमन देसाई, तर संघ व्यवस्थापक म्हणून बिंदिया यांनी जवाबदारी पार पाडली.