

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आम आदमी पक्षाला रामराम करून अॅड. अमित पालेकर बाहेर पडले आहेत. श्रीकृष्ण परवही बाहेर पडले आहेत. त्यांनी आपण कुठल्या पक्षात जाणार याबाबत वाच्यता केली नसली, तरी अॅड. अमित पालेकर यांना काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत का?,
असा प्रश्न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव त्यांच्यासोबत युरी आलेमाव यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर युरी आलेमाव यांनी तो निर्णय पक्ष नेतृत्वाने घ्यावयाचा आहे, असे सांगत भाजपशी लढा देणाऱ्या समविचारी नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
युरी म्हणाले की, आम आदमी पक्षाने एक लक्षात ठेवायला हवे की, पंजाबमध्ये जे झाले ते गोव्यात होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपशी लढा देण्यासाठी गोव्यात सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल.