Goa Petrol Pump Crowds | युद्धाच्या भीतीने गोव्यात 'पेट्रोल'साठी पळापळ! पणजीतील पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा

Goa Petrol Pump Crowds | इंधन पुरवठा बंद होण्याच्या भीतीने पणजीत गर्दी
Goa Petrol Pump Crowds
Goa Petrol Pump Crowds
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

सध्या आखाती देशामध्ये महायुद्ध सुरू असल्याने भारतात इंधनाची टंचाई होईल या भीतीने बुधवारी पणजीतील अनेक पेट्रोल पंपाच्या ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहन मालकांनी गर्दी केली.

Goa Petrol Pump Crowds
Goa Drug Case | ड्रग्ज प्रकरणी प्रलंबित खटल्याची सुनावणी 6 महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश

पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. भारताला पुरवठा होत असलेला इंधन साठा अचानक बंद होण्याची भीती लोकांमध्ये आहे. पणजी परिसरातील नेवगीनगर येथील दोन पेट्रोल पंपवरील इंधन साठा संपल्याने ते आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले होते.

त्यामुळे पणजी बसस्थानकावरील हिरा पेट्रोल पंप तसेच ठाकूर पेट्रोल पंपावर वाहन मालकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी झाली होती. वाहन चालक वाहनाच्या इंधनाच्या टाक्या फुल्ल करत आहेत.

Goa Petrol Pump Crowds
Sanquelim Land Conversion | साखळीतील ८० हजार चौ. मी. जमिनीचे रुपांतरण रद्द! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मोठा निर्णय

मात्र राज्यातील बहुतेक पेट्रोल पंपवर मुबलक इंधन साठा उपलब्ध असला तरी पणजीत मात्र त्याचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने काही ठिकाणी हे पेट्रोल पंप बंद ठेवले आहेत.

गॅस, पेट्रोलचा तुटवडा नाही

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही. बुकिंग केल्यानंतर १५ दिवसांत सिलिंडर पोचवला जातो. तसेच राज्यात आठ दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नयेत, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news